पालघर येथील ४ यात्रेकरूंचा उत्तराखंड येथे अपघातात मृत्यू !

अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे, वसई येथील धर्मराज खाटेकर, पुरुषोत्तम खिलखुटी आणि दहिसर येथील शिवाजी बुधकर यांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे घायाळ झाले.

मुंबई, रायगड आणि रत्नागिरी येथील समुद्रकिनार्‍यांवर आलेले श्री गणेशमूर्तींचे अवशेष उचलले !

मनसेच्या वतीने ‘आपला समुद्रकिनारा, आपले दायित्व’ मोहीम !

प्रभादेवी (मुंबई) येथे बेस्टच्या वीज सबस्टेशन केबिनला भीषण आग !

या आगीत दोन मोठे ट्रान्सफॉर्मर आणि तीन मोठे स्विच जळून खाक झाले आहेत, तर केबिनजवळील ५ दुचाकींना आगीची झळ बसल्याने हानी झाली आहे.

‘बेस्ट’ बस लवकरच हायड्रोजनवर धावणार !

वायू आणि ध्वनी प्रदूषण अल्प व्हावे यासाठी ‘बेस्ट’च्या प्रशासनाने बस हायड्रोजनवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात डिझेलवर चालणार्‍या २२२ बसचे हायड्रोजन इंधनावर चालवण्यासाठी रूपांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

थेट सरपंचपदांसह १ सहस्र १६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान  !

विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ सहस्र १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मतदान होणार आहे.

मढ-मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी मुंबई महानगरपालिकेकडून चौकशी समिती

मढ-मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी मुंबई महापालिकेकडून चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे. ही समिती १ मासात अहवाल सादर करणार आहे.

अतीवृष्टीमुळे महाराष्ट्रातील पीडितत शेतकर्‍यांसाठी वाढीव दराने ३ सहस्र ५०१ कोटी रुपयांचे साहाय्य !

अतीवृष्टी आणि पूरस्थिती यांमुळे एकूण २३ लाख ८१ सहस्र ९२० हेक्टर शेतीची हानी झाली असून २५ लाख ९३ सहस्र शेतकर्‍यांना अतीवृष्टीचा फटका बसला आहे. या पीडित शेतकर्‍यांसाठी ३ सहस्र ५०१ कोटी रुपयांचे साहाय्य करण्यात येणार आहे.

आतंकवादी टायगर मेमन याच्या धमकीनंतर याकूब मेनन याच्या कबरीची सजावट करण्यात आली !

मुंबई येथील साखळी बाँबस्फोटांत हात असलेला आतंकवादी याकूब मेमन याच्या कबरीचे रूपांतर स्मारकामध्ये करण्याची धमकी बाँबस्फोट प्रकरणातील पसार आरोपी टायगर मेमन याच्या नावाने दिली होती, अशी माहिती बडा कब्रस्तान ट्रस्टशी संबंधित एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना दिली आहे.

अनंतचतुर्दशीला मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

संपूर्ण महाराष्ट्रात अनंतचतुर्दशीच्या दिवशी १० दिवसाच्या ‘श्रीं’च्या मूर्तींचे भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात विसर्जन केले. २ वर्षांनंतर कोरोना महामारीच्या वेळची बंधने दूर झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा पूर्वीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात सर्वत्र भाविकांची गर्दी झाली.

अनंतचतुर्दशीला रायगड, रत्नागिरीला अतीवृष्टीची शक्यता ! – हवामान विभाग

बंगालच्या उपसागरात अल्प दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होऊ लागल्याने अनंतचतुर्दशीला रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत अतीवृष्टीची शक्यता हवमान विभागाने व्यक्त केली आहे.