मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जी भाषा सर्वांना जोडते, सर्वांना सामावून घेते आणि जात, धर्म, पंथ पलीकडची माणुसकी शिकवते तीच खर्‍या अर्थाने विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरले आहेत.

प्रदूषणाच्या नावाखाली केवळ हिंदूंवर होणारी एकमार्गी कारवाई थांबवावी !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केवळ हिंदूंच्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी सणांच्या वेळी एकमार्गी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकशाहीमध्ये भारतीय राज्यघटनेनुसार कारभार करतांना सर्व धर्मांना समान वागणून मिळणे अपेक्षित असतांना प्रदूषण मंडळाकडून होत असलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

वीज कामगार संघटना आणि सरकार यांच्यातील सकारात्मक चर्चेनंतर वीज कर्मचार्‍यांचा संप मागे !

पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार संघटना यांच्यात ४ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत वीज कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांविषयी सकारात्मक तोडगा काढण्यात आला. त्यानंतर ४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून वीज कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे.

भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठवली औरंगजेबाने तोडलेल्या मंदिरांची सूची !

औरंगजेब क्रूर आणि हिंद्वद्वेषी नव्हता, हे पटवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘औरंगजेब क्रूर असता, तर त्याने विष्णूचे मंदिर तोडले असते’, असे विधान केले होते. यावर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी औरंगजेबाने पाडलेल्या हिंदूंच्या मंदिरांची सूची आमदार जितेंद्र आव्हाड यांना पाठवली आहे.

वर्ष २०२२ मध्ये २८० दिवस मुंबईतील हवा अधिक प्रदूषित !

वर्ष २०२२ मध्ये ३६५ दिवसांपैकी २८० दिवस मुंबईतील हवा प्रदूषित झाली होती. वर्षभरात हवेची गुणवत्ता खाली आल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या आधारे पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी मांडला आहे.

शासकीय कामकाजात देवनागरी लिपीतील सुधारणांचा अवलंब करण्यास ६ मासांची मुदतवाढ !

शासकीय कामकाजात वापरण्यात येणार्‍या देवनागरी लिपीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा लागू करण्यासाठी शासनाकडून ६ मासांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या सुधारणांमध्ये वर्णमालेतील १२ स्वरांमध्ये ‘ॲ’ आणि ‘ऑ’ या २ अधिक स्वरांचा समावेश करण्यात आला आहे.

‘सोनी लिव’ने सत्य घटना मांडून भाग पुनर्प्रसारित करावा !

‘सोनी लिव’संकेतस्थळाने प्रसारित केलेला भाग आफताबच्या प्रकरणाचा नव्हता, तर त्याने (‘सोनी लिव’ने) त्यांच्या ‘ॲप’वरील २१२ क्रमांकाचा भाग काढून (डिलीट) का टाकला ? हा पुरावे नष्ट करण्याचाच प्रकार आहे. ‘सोनी लिव’ने व्यक्त केलेला खेद, हा हिंदु समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे.

इतिहास पालटण्याच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा निषेध करावा तितका थोडा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानाचे प्रकरण

राजकारणासाठी इतिहास पालटू शकत नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

छत्रपती संभाजी महाराज यांना देण्यात आलेली ‘धर्मवीर’ उपाधी ही काही आता देण्यात आलेली नाही. शेकडो वर्षांपासून त्यांना ही उपाधी आहे. धर्मांतर करण्यासाठी त्यांच्यावर निर्घृण अत्याचार करण्यात आले; परंतु त्यांनी धर्म सोडला नाही.

सुशांतसिंह राजपूत याच्या हत्येमागील सत्य लवकरच बाहेर येईल ! – आमदार नीतेश राणे, भाजप

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाल्याचे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. याचे पुरावे हळूहळू बाहेर पडत आहेत. सुशांतसिंह राजपूत याची हत्याच झाली आहे. यामागील सत्य लवकरच बाहेर येईल, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले आहे.