विशिष्‍ट वर्गाला हिंदु मुली या खेळाचे साधन वाटतात ! – आशिष शेलार, नेते, भाजप

लव्‍ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्‍य यांना तडा जात आहे. त्‍यामुळे ‘लव्‍ह जिहाद’विरोधात राज्‍य सरकारने कायदा करावा आणि समस्‍त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा.

धारावी (मुंबई) येथील रुबीना खान (पूर्वाश्रमीची यशोधरा खाटीक) हिचा संशयास्पद मृत्यू, हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार ! – कुटुंबियांचा आरोप

वारंवार घडणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या घटना, या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची अनिवार्यता अधोरेखित करतात !

घुसखोर बांगलादेशींना हटवण्‍यासाठी दादर (मुंबई) येथे भाजपचे आंदोलन !

बांगलादेशी रोहिंगे दादागिरी करून जागा बळकावत आहेत. मराठी माणसाच्‍या जिवावर पैसे कमवायचे आणि ते बांगलादेशी घुसखोरांसाठी वापरायचे, हे आम्‍ही कदापी खपवून घेणार नाही.

मुंबईत साखळी बाँबस्फोट होणार असल्याचा दावा करणारा पोलिसांच्या कह्यात !

येत्या २ मासांत मुंबईतील माहीम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा आदी ठिकाणी वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बाँबस्फोट होणार असल्याचा दावा करणार्‍याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

सत्तांतरामुळे कार्यरत नसलेल्या विधानमंडळाच्या समित्यांचे पुनर्गठन होणार !

महाराष्ट्रातील सत्तांतरामुळे मागील ६ मासांपासून कार्यरत नसलेल्या विधानमंडळाच्या समित्यांचे पुनर्गठन येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

७७ सहस्र एकरहून अधिक भूमी असलेल्या वक्फ मंडळाचा कारभार पारदर्शक नाही !

सरकारचे विविध विभाग आणि महामंडळे यांची यासाठीची स्वतंत्र संकेतस्थळे आहेत; मात्र ७७ सहस्र एकरहून अधिक भूमीची मालकी असलेल्या वक्फ प्राधिकरणाचे कामकाज लोकशाहीचे मालक असलेल्या नागरिकांपर्यंत पोचतच नाही.

मुंबई येथे ऊर्जा फाऊंडेशन आणि आरोग्‍य भारती यांच्‍या वतीने विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांचा गौरव !

११ आणि १२ मार्च या दिवशी ऊर्जा फाऊंडेशन अन् नॅशनल इन्‍स्‍टिट्यूट ऑफ होलिस्‍टिक हेल्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आंतरराष्‍ट्रीय आरोग्‍य परिषद आयोजित करत आहेत.

अयोग्‍य गोष्‍टींची नोंद न घेतल्‍यास महिला आयोगाच्‍या खुर्चीवर बसण्‍याचा अधिकार नाही ! – चित्रा वाघ, उपप्रदेशाध्‍यक्षा, भाजप

राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रूपाली चाकणकर यांना अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली आहे. या वेळी चित्रा वाघ म्‍हणाल्‍या, ‘‘अशा प्रकारचा नंगानाच महाराष्‍ट्राला शोभनीय नाही. असे नगण्‍य कपडे घालून अंगप्रदर्शन किती योग्‍य आहे ?

देवेन भारती यांनी मुंबईच्‍या विशेष पोलीस आयुक्‍तपदाचा पदभार स्‍वीकारला !

भारतीय पोलीस सेवेतील वरिष्‍ठ अधिकारी देवेन भारती यांनी ५ जानेवारी या दिवशी मुंबईच्‍या विशेष पोलीस आयुक्‍तपदाचा पदभार स्‍वीकारला. मुंबईच्‍या इतिहासात प्रथमच विशेष पोलीस आयुक्‍त पदाची निर्मिती करण्‍यात आली आहे.

उत्तरप्रदेशात महाराष्‍ट्र भवनासाठी जागा देण्‍याचे योगी आदित्‍यनाथ यांचे आश्‍वासन !

उत्तरप्रदेश येथे १० ते १२ जानेवारी या कालावधीत होणार्‍या ‘ग्‍लोबल इन्‍व्‍हेस्‍टर समिट’साठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्‍यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ मुंबईच्‍या दौर्‍यावर आले आहेत.