काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत ! – डॉ. डी.एम्. मुळ्ये, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग

काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्यासह त्यांच्यावर अत्याचार करणार्‍यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !

देवतांची चित्रे काढण्याचा आदेश देणार्‍या शिक्षणाधिकार्‍यांना समज दिली आहे ! – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

धुळे जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देसले यांनी ६ जानेवारी या दिवशी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये यांतील मुख्याध्यापकांना पत्र पाठवून शाळा-महाविद्यालये यांमध्ये सरस्वतीदेवीचे चित्र असल्यास ते काढण्याचा आदेश दिला होता.

माझा पती आदिल खान हा दुसर्‍या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याने आमच्या ७ मासांपूर्वी झालेल्या निकाहाचा मी उलगडा केला ! – अभिनेत्री राखी सावंत

हा ‘लव्ह जिहाद’ नाही, तर काय आहे ? तो नाकारणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

(म्हणे) ‘स्वर्गात माझी आवडती फळे उपलब्ध नसल्याने मला नरकात जायचे आहे !’

स्वर्ग आणि नरक यांच्याविषयी काडीमात्र ज्ञान नसतांना बेताल विधाने करणारे जावेद अख्तर !

भारतात १५ ऑगस्ट १९४७ नंतर महापुरुष जन्माला येणे बंद झाले ! – अभिनेते शरद पोंक्षे

उगवलेल्या रोपट्याचे सर्वच दाणे बाजारात विकायला जात नाहीत. त्यांतील काही दाणे स्वतःला त्याच भूमीमध्ये पुन्हा गाडून घ्यायला सिद्ध होतात; म्हणून त्यातून दुसरे दाणे निर्माण होतात. ही साखळी आहे; पण ही साखळी १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी संपली.

वक्‍फ प्राधिकरणाचे कामकाज संकेतस्‍थळावर येण्‍यासाठी केंद्रशासनाला विनंती करणार ! – सैयद शहेजादी, राष्‍ट्रीय अल्‍पसंख्‍यांक आयोग

सैयद शहेजादी मागील ३ दिवसांपासून महाराष्‍ट्र दौर्‍यावर आल्‍या होत्‍या. ११ जानेवारी या दिवशी सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत त्‍या बोलत होत्‍या.

साखळी बाँबस्‍फोटाच्‍या शक्‍यतेच्‍या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील रेल्‍वेस्‍थानकांवर श्‍वान पथकाद्वारे पडताळणी !

दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्‍या नियंत्रण कक्षामध्‍ये ‘येत्‍या २ मासांत मुंबईमध्‍ये साखळी बाँबस्‍फोट होणार’, असा दावा करणारा दूरभाष आला होता. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील महत्त्वाच्‍या रेल्‍वेस्‍थानकांवर श्‍वानपथकाद्वारे पडताळणी चालू करण्‍यात आली आहे.

महाराष्ट्रात ‘प्रिव्हेंशन ऑफ कट प्रॅक्टिस कायदा’ तत्परतेने लागू करावा !

राज्यात ‘कट प्रॅक्टिस’द्वारे रुग्णांची उघडपणे लुटमार चालू आहे. अन्य क्षेत्रांत ज्याप्रमाणे संघटित गुन्हेगारी चालते, त्याप्रमाणे आरोग्याच्या क्षेत्रात ‘कट प्रॅक्टिस’द्वारे संघटित गुन्हेगारी चालू आहे.

शिवसेनेच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेविषयीची सुनावणी १४ फेब्रुवारीला !

शिवसेनेतून बाहेर पडून भाजपला पाठिंबा देणार्‍या आमदारांतील १६ जणांना अपात्र ठरवावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी १४ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.

भारतातील मुंबई आणि भाग्‍यनगर ही दोन शहरे वृक्षारोपणात अव्‍वल !

शहरात असलेल्‍या चिमण्‍यांची संख्‍या, बायोडायव्‍हरसिटी, ट्री बोर्ड आणि बजेट या सर्वेक्षणात पडताळण्‍यात आले. यात देशातील मुंबई आणि भाग्‍यनगर ही दोन शहरे अव्‍वल ठरली.