साखळी बाँबस्‍फोटाच्‍या शक्‍यतेच्‍या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील रेल्‍वेस्‍थानकांवर श्‍वान पथकाद्वारे पडताळणी !

मुंबई, ११ जानेवारी (वार्ता.) – दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्‍या नियंत्रण कक्षामध्‍ये ‘येत्‍या २ मासांत मुंबईमध्‍ये साखळी बाँबस्‍फोट होणार’, असा दावा करणारा दूरभाष आला होता. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील महत्त्वाच्‍या रेल्‍वेस्‍थानकांवर श्‍वानपथकाद्वारे पडताळणी चालू करण्‍यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार्‍या स्‍थानिक रेल्‍वे गाड्यांमध्‍ये श्‍वानासह पोलीस पडताळणी करत आहेत. सर्व अन्‍वेषण यंत्रणांना सतर्क रहाण्‍याचा आदेश मुंबई पोलीस आयुक्‍तांनी दिला आहे.