‘शंकरवाडी’ हेच मेट्रो स्‍थानकाचे नाव कायम ठेवावे ! – आमदार रवींद्र वायकर

शंकरवाडी’ हे नाव अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. हे नाव पालटून ‘मोगरा विलेज’ केल्‍यामुळे स्‍थानिकांमध्‍ये असंतोष निर्माण होऊ शकतो. ‘शंकरवाडी’ हेच नाव ठेवण्‍यात यावे.

बॉलीवूडवाले क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत मुसलमानधार्जिण्‍या चित्रपटांवर बहिष्‍कार चालूच ठेवा ! – तान्‍या, संपादिका, ‘संगम टॉक्‍स’ यू ट्यूब वाहिनी

चित्रपटांतून ‘लव्‍ह जिहाद’ला प्रोत्‍साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्‍कार घालत असल्‍याने बॉलीवूडची आर्थिक हानी होत आहे.

पराक्रमी पूर्वजांचा आम्‍हाला अभिमान आहे ! – सुधीर मुनगंटीवार

पानिपतच्‍या युद्धात आमच्‍या पराक्रमाचा आक्रमण करणार्‍या अब्‍दाली याने इतका धसका घेतला की, पुन्‍हा तो परतून आलाच नाही. वायव्‍य दिशेवरून पुन्‍हा भारतात आक्रमण झाले नाही. सर्वस्‍व पणाला लावून परकीय आक्रमकांना कायमची अद्दल घडवणार्‍या आमच्‍या पराक्रमी पूर्वजांचा आम्‍हाला अभिमान आहे…

मला सुरक्षा पुरवण्‍यात यावी !

मला भाजपच्‍या सौ. चित्रा वाघ यांनी धमकावले असल्‍यानेे मला घरात आणि घराबाहेर असुरक्षित वाटत आहे. त्‍यामुळे मला सुरक्षा पुरवण्‍यात यावी, अशी मागणी अभिनेत्री उर्फी जावेद हिने महिला आयोगाला पाठवलेल्‍या ‘मेल’मध्‍ये केली आहे.

बाँबस्‍फोटातील आरोपी ‘महाराष्‍ट्रबार काऊन्‍सिल’मध्‍ये सहभागी होणार !

वर्ष २०११ मध्‍ये येथे झालेल्‍या साखळी बाँबस्‍फोट प्रकरणातील आरोपी नदीम अख्‍तर अधिवक्‍ता होऊ शकणार आहे. त्‍याचा ‘महाराष्‍ट्र बार काऊन्‍सिल’मधील सहभाग निश्‍चित होत असल्‍याचे समजते. तो बाँबस्‍फोटप्रकरणी गेल्‍या १० वर्षांपासून कारागृहात आहे.

तुर्भे (वाशी) येथील परिसरात अनधिकृत होर्डिंग्ज !

आचारसंहितेचे उल्लंघन करत अनधिकृत होर्डिंग्ज लावल्याच्या प्रकरणातील दुर्लक्ष करणार्‍या संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

हलाल अर्थव्यवस्थेचे धोके समजून घेणे आणि त्यास विरोध करणे हे प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचे कर्तव्य ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भविष्‍यात व्‍यापारी, उद्यमी, नागरिक, समाज आणि राष्ट्र यांच्यासाठी मोठा धोका उद्भवू शकतो. यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. हलाल अर्थव्यवस्थेचे धोके समजून घेणे आणि त्यास विरोध करणे, हे प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन श्री. रमेश शिंदे यांनी केले.

मानवी हक्‍कांचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी  ३२ लाख रुपये हानीभरपाई द्या !

मानवी हक्‍काचे उल्लंघन झाल्‍याच्‍या ३५० तक्रारी राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडे आल्‍या होत्‍या. त्‍यांतील २०० तक्रारींवर चर्चा झाली. यामध्‍ये ३२ लाख रुपयांची हानीभरपाई देण्‍याचा आदेश राज्‍य सरकारला देण्‍यात आला आहे

घाटकोपर येथे १४ जानेवारीला होणार्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त भव्‍य वाहनफेरी !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घाटकोपर (मुंबई) येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या प्रचारार्थ १३ जानेवारी या दिवशी वाहनफेरीचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी ५० हून अधिक वाहनचालकांनी वाहनफेरीत सहभाग घेतला.

सुट्टीच्या काळात सहकार्‍याला संपर्क साधल्यास १ लाख रुपये दंड !

येथील ‘ड्रीम ११ फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म’ या आस्थापनाने सुट्टीच्या काळात सहकार्‍याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार्‍या कर्मचार्‍यांना १ लाख रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.