११ जुलैपासून गोकुळच्या दूध खरेदी दरात वाढ ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

म्हैशीच्या दुधाचा खरेदी दर २ रुपयांनी, तर गायीच्या दुधाचा खरेदी दर १ रुपयांनी वाढवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी ८ दिवसांसाठी कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवले ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

८ दिवसांनंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

‘डॉक्टर्स डे’ आणि कृषीदिन यांच्या निमित्ताने कडीपत्ता अन् तुळस यांच्या २०० रोपांचे वाटप !

हे वाटप साहाय्यक वनसंरक्षक दशरथ गोडसे आणि अरुण पाटील, सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ मानसिंग शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण !

याचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी केले होते.

कोल्हापूर महापालिकेने रंकाळा तलावाची स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलन ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कोल्हापूर आयुक्तांना निवेदन

सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या महापालिका प्रशासनास रंकाळा तलावाची ही दुरावस्था का दिसत नाही ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ? नागरिकांच्या कररूपातून वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काय करतात ?

पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी वारकरी ३ जुलैला आळंदी येथून प्रस्थान करणार ! – संतवीर बंडातात्या कराडकर

यंदाही वारकरी संप्रदायाशी चर्चेचे नाटक करून पादुका सोहळा पायी जाऊ नये, असा एकतर्फी निर्णय घोषित केला. वारकरी संप्रदायाच्या किमान १०० लोकांसमवेत हा सोहळा होण्याच्या भावनेचा चुराडा केला आहे.

पुढील आदेश लागू होईपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ४ थ्या स्तरातील निर्बंध !

प्रशासनाच्या निर्णयास ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चा विरोध

कोल्हापूरच्या अस्मितेस कोणीही डिवचण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना खपवून घेणार नाही ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोल्हापूरच्या स्वागत कमानीवर शिवसेनेकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फलक

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून नरवीरांची समाधीस्थळे आणि हिंदूंची मंदिरे यांचा जिर्णाेद्धार करा ! – बजरंग दलाचे नायब तहसीलदारांना निवेदन 

एकीकडे राज्य सरकारने  ‘गडकोट संवर्धन मोहीम’ हाती घेतली आहे आणि दुसरीकडे विशाळगडाच्या ऐतिहासिक वारशाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

विविध मागण्यांसाठी आशा कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊनही त्याची कोणतीही नोंद न घेतल्याने महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला. त्याचाच एक भाग म्हणून हा मोर्चा काढला.