इस्लामी देशांच्या संघटनेच्या बैठकीत काश्मीरवर चर्चा होणार नाही !

पाकला पुन्हा चपराक ! ‘ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओ.आय.सी.) या इस्लामी देशांच्या संघटनेच्या बैठकीमध्ये काश्मीरवर कोणतीही चर्चा होणार नाही. या बैठकीसाठी हा विषयच ठेवण्यात आलेला नाही !

‘शॉर्ट्स’द्वारे (तोकडे कपडे) गणपतीचे विडंबन करणार्‍या ब्राझिलच्या आस्थापनाने मागितली क्षमा !

ब्राझिलमधील हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम ! भारतात प्रतिदिन विविध माध्यमांतून देवता, प्रथा-परंपरा आदींचा अनादर होऊनही त्यावर काही न बोलणारे भारतातील बहुसंख्यांक हिंदू ब्राझिलमधील हिंदूंकडून काही बोध घेतील का ?

१० वर्षांची शिक्षा झालेला आतंकवादी हाफिज सईद कारागृहात नाही, तर घरात !

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज सईद घरामध्येच सुरक्षित असून तो पाहुण्यांना सहज भेटू शकतो.

‘कोरोना’रूपी भ्रष्टाचार !

लाचखोरी आणि भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी प्रामाणिक लोकांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समाजमनावर धर्मशिक्षणाचे संस्कार होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी संघटित होऊन याविरोधात लढा दिला, तर यश मिळू शकते, तसेच अशा लढ्याला ईश्‍वरी अधिष्ठान असेल, तर यश निश्‍चित !

मुंबईवरील आक्रमणात मृत झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये स्मारक उभारण्यात येणार !

स्मारक उभारणे हे योग्य असले, तरी ज्यांनी हे आक्रमण केले, त्यांची कबर खोदण्याची अधिक आवश्यकता आहे, त्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?

भारताची लज्जास्पद स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

लाचखोरीच्या संदर्भात आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात लाचखोरीचा दर ३९ टक्के आहे.

रिश्‍वतखोरी में भारत एशिया में पहले क्रमांक पर ! – ट्रान्सपरेन्सी इंटरनेशनल

यह स्थिति बदलने के लिए हिन्दू राष्ट्र चाहिए !

पाकिस्तानमध्ये आता बलात्कार्‍याला नपुंसक करण्यात येणार

पाकिस्तान असे करू शकतो, तर भारत का नाही ? १३० कोटी लोकसंख्या असणार्‍या भारतात प्रतिदिन अनेक महिलांवर बलात्कार केले जातात, त्यानंतर त्यांच्या हत्याही होत असतात. असे असतांना भारताने आतापर्यंत अशी शिक्षा करण्याचा कायदा का केला नाही ?

(म्हणे) ‘भारताने चिनी अ‍ॅप्सवर घातलेली बंदी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारी !’ – चीनचा आरोप

भारताच्या सुरक्षेच्या मुळावर येणार्‍या कोणत्याही गोष्टीवर बंदी घालण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे, हे चीनने नेहमीच लक्षात ठेवावे !

पाक संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या आतंकवाद्यांना आश्रय देतो ! – भारताची पाकवर टीका

पाकने संयुक्त राष्ट्रामध्ये खोटी कागदपत्रे असणारा अहवाल सादर केल्यावरून भारताने पाकवर टीका केली आहे. पाकने याद्वारे भारतावर पाकमध्ये आतंकवाद भडकावल्याचा आरोप केला आहे.