मुंबईवरील आक्रमणात मृत झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये स्मारक उभारण्यात येणार !

स्मारक उभारणे हे योग्य असले, तरी ज्यांनी हे आक्रमण केले, त्यांची कबर खोदण्याची अधिक आवश्यकता आहे, त्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?

तेल अवीव (इस्रायल) – मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री झालेल्या जिहादी आक्रमणात देश-विदेशातील १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमधील ऐलात शहरामध्ये एक स्मारक उभारण्यात येणार आहे. या आक्रमणात ज्यू धर्मियांनाही लक्ष्य करण्यात आले होते. मुंबईत ज्यू नागरिकांचे वास्तव्य असणार्‍या छाबड हाऊस (नरिमन हाऊस) या इमारतीवर आक्रमण करण्यात आले होते.