१० वर्षांची शिक्षा झालेला आतंकवादी हाफिज सईद कारागृहात नाही, तर घरात !

पाकची धूळफेक !

यातून पाकचा पुन्हा एकदा आतंकवादी तोंडवळा उघड होतो ! आता जगाने पाकला आतंकवादी देश घोषित केले पाहिजे आणि त्यासाठी प्रथम भारताने त्याच्याशी सर्वप्रकारे संबंध तोडून त्याला आतंकवादी देश घोषित केले पाहिजे !

आतंकवादी हाफिज सईद

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या आतंकवादविरोधी न्यायालयाने मुंबईवर झालेल्या २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याला काही दिवसांपूर्वी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे तो कारागृहात असणे अपेक्षित असतांना तो लाहोरच्या जोहर टाऊनमधील त्याच्या घरातून आतंकवादी संघटना चालवत असल्याचे उघड झाले आहे. आतंकवाद्यांचा अर्थपुरवठा करणार्‍यांवर लक्ष ठेवणार्‍या एफ्.ए.टी.एफ्. संस्थेच्या काळ्या सूचीमध्ये टाकले जाण्याच्या भीतीमुळेच पाकने हाफिज सईद याच्यावर कारवाई केल्याचे दाखवले, हे आता स्पष्ट होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज सईद घरामध्येच सुरक्षित असून तो पाहुण्यांना सहज भेटू शकतो. गेल्या मासामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या जिहाद शाखेचा प्रमुख झाकी-उर्-रहमान लखवी याने घरी जाऊन सईद याची भेट घेतली. पैसे जमवण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. मुंबईवरील आक्रमणामध्ये लखवी याचाही हात होता; मात्र तो मोकाट फिरत आहे.