अखेर अकलूज नगरपरिषद आणि नातेपुते नगर पंचायत म्हणून घोषित !
हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मागील ४३ दिवस अकलूज येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण चालू होते.
हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मागील ४३ दिवस अकलूज येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण चालू होते.
उरण नागाव ओ.एन्.जी.सी. प्रकल्पामध्ये नोकरी मिळावी किंवा कंत्राट मिळावे, या मागणीसाठी नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेच्या वतीने वरील आस्थापनाच्या समोर उपोषण चालू करण्यात आले आहे.
मृतांचे नातेवाईक या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनाही भेटणार आहेत, तसेच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नातेवाइक आणि संघटना आमरण उपोषणाला बसणार, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.
माहिती अधिकारातून घेतलेल्या माहितीच्या आधारे सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचा आरोप !
पाटण येथील तहसील कार्यालयासमोर १० फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण आयोजित करण्यात आले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.
उघडपणे चालणार्या अवैध पशूहत्येच्या विरोधात कारवाई न करणारे वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन जनतेच्या हितासाठी काम करते कि कसायांसाठी ?
पोलीस खात्यातील अनेक अधीक्षक दबावाखाली काम करत असल्याचेही सांगत त्यांच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप हिरालाल जाधव यांनी केला आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये स्वत:च्या २ मुलांना मुंडे यांनी शासकीय चित्रकूट बंगल्यामध्ये डांबून ठेवले असल्याचा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
अण्णा हजारे यांनी काय करावे आणि ते कसे आहेत, हे देशाची सर्वाधिक हानी करून देशाला रसातळाला नेणार्या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. अण्णा हजारे यांनी काय करावे आणि काय करू नये, याचे स्वातंत्र्य त्यांना नाही का ?
गत २५ वर्षे नवीन कुर्ली गावात सहस्रो लोक वास्तव्य करत आहेत. ग्रामपंचायत नसल्याने त्यांना शासकीय कामांसाठी लागणारे दाखले मिळत नाहीत. गावातील रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत आवश्यकतांसाठी शासनाकडून निधी मिळत नाही.