शेगावच्या प्रसिद्ध कचोरी केंद्रावर धाड !

अन्न-औषध प्रशासनाकडून कच्च्या मालाचे नमुने जप्त !

शेगाव (जिल्हा बुलढाणा) – अन्न-औषध प्रशासनाने येथील प्रसिद्ध कचोरी केंद्रावर धाड घातली. या वेळी कचोरी बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाचे नमुने पडताळणीच्या दृष्टीने कह्यात घेण्यात आले. या नमुन्यात भेसळ आढळून आल्यास शेगाव कचोरी केंद्रावर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे.