
दौंड (पुणे) – अन्न व औषध प्रशासनाने (एफ्.डी.ए.ने) केलेल्या धडक कारवाईमुळे दौंड तालुक्यातील अनुमाने ४०० गुर्हाळघरे बंद झाली आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव आणि बोरीपार्धी येथे झालेल्या धाडीत १७ लाख रुपयांचा भेसळयुक्त गूळ जप्त करण्यात आला, ज्यामुळे परप्रांतीय चालक धास्तावले आहेत.
या कारवाईनंतर आता उसाच्या दरावरून पेच निर्माण झाला आहे. शुद्ध आणि भेसळमुक्त गूळ निर्माण करण्यासाठी अन् आर्थिक गणित जुळण्यासाठी उसाचा दर प्रतिटन ३ सहस्र ५०० रुपये असावा, अशी मागणी गुर्हाळ चालकांनी केली आहे; तर मालक आणि शेतकरी ४ सहस्र २०० रुपयांच्या दरावर ठाम आहेत. या वादामुळे गाळप ठप्प असून अनुमाने ३ सहस्र टन ऊस आता वाळू लागला आहे. यावर सुवर्णमध्य काढण्यासाठी केडगाव येथे महत्त्वाची बैठक होणार आहे.
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती