
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये ‘ग्रूमिंग गँग्स’च्या महिलांवरील अत्याचारांविषयी पुन्हा एकदा चर्चा चालू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी वंशाच्या शेराज मलिकला १८ वर्षीय ब्रिटीश तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला ‘समाजासाठी धोका’ मानून अशीही अट घातली की, शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही त्याला ४ वर्षे देखरेखीखाली रहावे लागेल. (ब्रिटनचे इस्लामीकरण होण्यापासून रोखण्यासाठी अशा प्रकारे ‘पाकिस्तानी मुसलमान आणि गुन्हेगार’ असे समीकरण झाले पाहिजे, अशी मागणी कुणा ब्रिटीश राष्ट्रवाद्यांनी केली, तर त्यात चूक ते काय ? – संपादक)
१. ही घटना जून २०२५ मध्ये नॉटिंगहॅमशायरमधील ‘सटन लॉन पार्क’ येथे घडली. पीडिता एका मैत्रिणीसमवेत पार्कमध्ये आली होती. काही वेळाने तिची मैत्रीण निघून गेली आणि तरुणी तिथे एकटीच राहिली. शेराज मलिकने त्या तरुणीला पार्कच्या एका निर्जन भागात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
२. पीडितेने न्यायालयाला सांगितले की, तिने अनेकदा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; परंतु आरोपीने तिच्या चेहर्यावर आणि डोक्यावर प्रहार केले.
३. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी असेही समोर आले की, त्याच रात्री आणखी एका धर्मांधाने पीडितेवर बलात्कार केला होता; मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
४. न्यायाधीश सायमन ॲश केसी यांनी नमूद केले की, आरोपीने अमली पदार्थांच्या प्रभावाखाली असतांना एका एकट्या आणि असाहाय्य तरुणीवर बलात्कार केला. त्याने स्वत:च्या गुन्ह्याविषयी कुठलाही पश्चात्ताप व्यक्त केला नाही.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार