
पणजी, १२ जून (वार्ता.) – वीज ग्राहकांना वीजभार वाढल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत वीजदेयके दुप्पट किंवा तिप्पट आकारली जात आहेत. यावरून राज्यात सध्या वीज अभियंत्यांना खडसावले जात आहे. वीज देयकांविषयीच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आहे. ज्या वीजग्राहकांना अनपेक्षितपणे विजेचे अधिक रकमेचे देयक आले आहे ते वीज खात्याकडे लिखित स्वरूपात तक्रार करू शकतात. या काळात ग्राहक विजेचे देयक भरू शकले नाहीत, तर त्यांची वीजजोडणी तोडली जाणार नाही.’’
वीजभार वाढल्याची पूर्वकल्पना न देता वीजदेयकात दंड आकारणे चुकीचे ! – सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत
मडगाव – १२ जून या दिवशी वाढीव वीजदेयकांविषयीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी मडगाव मतदारसंघातील स्थानिक नागरिकांसह वीज खात्याचे अधीक्षक अभियंता राजीव सामंत यांची भेट घेतली. त्यानंतर मंत्री दिगंबर कामत म्हणाले, ‘‘वीज ग्राहकांना वीजभार वाढल्याची पूर्वकल्पना किंवा माहिती न देता थेट देयकामध्ये दंडाची रक्कम वसूल करणे अत्यंत चुकीचे आहे. कोणतीही थकबाकी न ठेवता प्रामाणिकपणे विजेचे देयक भरणार्या ग्राहकांना अशा प्रकारे वेठीस धरले जाऊ शकत नाही. वीजदेयकाची दंडात्मक रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याची सोय ग्राहकांसाठी केली जाईल, असे वीजमंत्र्यांनी म्हटले असले, तरी हा पर्याय योग्य नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असून लवकरच भाजप प्रदेशाध्यक्षांशीही चर्चा करणार आहे.’’ ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजदेयकांच्या संदर्भात मंत्री दिगंबर कामत यांनी मडगाव येथे नागरिकांसह वीज अभियंत्यांची भेट घेतल्याविषयी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना विचारले असता त्यांनी ‘याविषयी मुख्यमंत्र्यानाच विचारा’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
भायखळा आणि भिवंडी येथे ‘मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र’ चालू करा ! – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष
भेसळ आणि दराच्या वादात गुर्हाळ व्यवसाय संकटात !
शेगावच्या प्रसिद्ध कचोरी केंद्रावर धाड !
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !