
सोलापूर – महाराष्ट्र साहित्य परिषद, दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’च्या इतिहासावर दैनिक ‘सकाळ’चे सहयोगी संपादक, पत्रकार तथा युवा अभ्यासक सिद्धराम पाटील यांचे व्याख्यान १४ जून या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘लोकमान्य टिळक सभागृह’ (ॲम्फी थिएटर) येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. व्याख्यानात ‘वन्दे मातरम्’ गीताचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, राष्ट्रजागरणातील भूमिका आणि राष्ट्रीय गीत म्हणून झालेला स्वीकार यांविषयी माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी, विशेषतः युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री
पावसाची उसंत : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडले !