मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई – समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये भिवंडी आणि भायखळा येथे मराठी भाषेचे प्रशिक्षणवर्ग चालू करावेत, अशी मागणी केली आहे. ‘इच्छुकांसाठी अल्पदरांमध्ये अल्प आणि दीर्घ अभ्यासक्रम चालू करावेत. प्रशिक्षण घेतल्यास प्रमाणपत्र द्यावे’, असे आमदार रईस शेख यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. ‘या परिसरातील विद्यार्थी, युवक-युवती, कामगार आणि व्यावसायिक यांना मराठी शिकण्याची इच्छा आहे; मात्र त्यासाठी कोणतीही सोय नाही. मराठीवर सर्वांचा हक्क आहे’, असेही ते म्हणाले.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !