भाववाढ झाली असली, तरी ठेकेदारांनी कामे पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार !

प्रतिकात्मक इमेज

पुणे – बेकायदेशीर आर्.एम्.सी. प्रकल्प चालकांच्या विरोधात महापालिकेने कारवाई चालू केली होती. त्यामुळे प्रकल्प चालकांनी प्रत्येक घनमीटर मागे अडीच सहस्र रुपये वाढवले आहेत. अमेरिका-इराण युद्धामुळे डिझेलचे भावही वाढले आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च, खडी, मुरूम आदींचे दर वाढल्याने शहरातील रस्ते बांधणीच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. ठेकेदारांची कामे अर्धवट राहिली असल्यामुळे उर्वरित कामांसाठी आणखी निधी देण्याची मागणी केली; मात्र महापालिकेने वाढीव निधी देण्यास नकार दिला असून लहान कामांना भाववाढ लागू नसते असे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेला कोणताही आदेश पथविभागाला मिळालेला नाही. त्यामुळे रस्ते बांधणीच्या कामात खर्च वाढला, महागाई वाढली तरी काम पूर्ण करावे लागेल. जे नियमानुसार काम पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी पथविभाग प्रमुख राजेश बनकर यांनी ठेकेदारांना दिली.

संपादकीय भूमिका

स्वतःच्या आर्थिक लाभासाठी ठेकेदार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणार नाहीत, याचीही काळजी पालिकेने घ्यावी !