हिंदु राष्ट्र हे संस्कृती, परंपरा, भाषा, आचार आणि हिंदुत्व यांनी युक्त असलेले राष्ट्र असेल ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

धर्मनिरपेक्षतेचे विष आपल्यात पेरले जात आहे, ते आपल्याला संघटितपणे हाणून पाडायचे आहे. या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र हा एकच उपाय आहे.

‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्र घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती

धार्मिक स्‍थळ ‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्‍या रूपात घोषित करण्‍याविषयीची जैन समुदायाची मागणी त्‍वरित स्‍वीकारावी, अशी मागणी देहलीतील जंतरमंतर येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली. या आंदोलनामध्‍ये अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ सहभागी झाले होते.

कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवीला साकडे

श्री महालक्ष्मीदेवीला नारळ अर्पण करून, तिची ओटी भरण्यात आली, तसेच देवीला साकडे घालण्यात आले. या प्रसंगी ‘आई श्री महालक्ष्मीदेवीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ द्यावे’, अशी प्रार्थनाही करण्यात आली.

‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देणे आवश्यक आहे. देहलीतील दंगेखोरांच्या बचावासाठी पुढे आलेली ‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या धर्मांध संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी.

मॉरिशस येथील इस्कॉन संप्रदायाचे प.पू. सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज यांना ‘सनातन पंचांग २०२३’ भेट !

इस्कॉन मंदिर, पिंपळगाव येथे मॉरिशस येथील प.पू. सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज यांचे ११ ते १३ जानेवारी या कालावधीत भक्तांसाठी सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय फोकमारे यांनी महाराजांना ‘सनातन पंचांग २०२३’ भेट दिले.

जिजाऊ निर्माण झाल्या, तरच शिवराय जन्माला येतील ! – सौ. पुष्पा चौगुले, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक स्त्रीने धर्माचरण केले पाहिजे. हिंदु धर्मशास्त्रातील प्रत्येक धार्मिक कृती मागील अध्यात्मशास्त्र स्वतः जाणून घेऊन आपल्या मुलांना सांगितले पाहिजे, तरच मुले धर्माचरण करतील.

हलाल अर्थव्यवस्थेचे धोके समजून घेणे आणि त्यास विरोध करणे हे प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचे कर्तव्य ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भविष्‍यात व्‍यापारी, उद्यमी, नागरिक, समाज आणि राष्ट्र यांच्यासाठी मोठा धोका उद्भवू शकतो. यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. हलाल अर्थव्यवस्थेचे धोके समजून घेणे आणि त्यास विरोध करणे, हे प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन श्री. रमेश शिंदे यांनी केले.

घाटकोपर येथे १४ जानेवारीला होणार्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त भव्‍य वाहनफेरी !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घाटकोपर (मुंबई) येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या प्रचारार्थ १३ जानेवारी या दिवशी वाहनफेरीचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी ५० हून अधिक वाहनचालकांनी वाहनफेरीत सहभाग घेतला.

‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाच्‍या माध्‍यमातून लोकांपर्यंत माहिती पोचवण्‍याचा प्रयत्न ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल जिहाद’च्‍या संकटाची माहिती हिंदूंना  होण्‍यासाठी, तसेच त्‍या संदर्भात जागृती करण्‍यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाच्‍या माध्‍यमातून कोणती उत्‍पादने हलाल प्रमाणित आहेत, ते समजण्‍यास आपल्‍याला साहाय्‍य होईल.

हावडा (बंगाल) येथे आयोजित केलेल्‍या भव्‍य शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने श्री. सीताराम साहा सहभागी झाले होते. या शोभायात्रेत ‘प्रत्‍येक हिंदु सेना हो, प्रत्‍येक हिंदु सनातनी हो’, ‘हम भारत भव्‍य बनाएंगे, हम हिंदु राष्‍ट्र बनाएंगे !’, अशा विविध घोषणा देण्‍यात आल्‍या.