हावडा (बंगाल) येथे आयोजित केलेल्‍या भव्‍य शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

पुरी पीठाधीश्‍वर श्रीमद़्‍जगद़्‍गुरु शंकराचार्य स्‍वामी श्री निश्‍चलानंद सरस्‍वती महाराज यांचे ‘मकरसंक्रांती’ या शुभतिथीच्‍या निमित्ताने कोलकाताच्‍या गंगासागर येथे शुभागमन

हावडा (बंगाल) – पूज्‍यपाद श्रीगोवर्धन मठ पुरी पीठाधीश्‍वर श्रीमद़्‍जगद़्‍गुरु शंकराचार्य स्‍वामी श्री निश्‍चलानंद सरस्‍वती महाराज यांचे ‘मकरसंक्रांती’ या शुभतिथीच्‍या निमित्ताने कोलकाताच्‍या गंगासागर येथे शुभागमन झाले. तत्‍पूर्वी ‘आदित्‍य वाहिनी’, ‘आनंद वाहिनी’ आणि ‘पीठ परिषद (बंगाल)’, यांच्‍या भक्‍तांनी आदिगुरु शंकराचार्य मंदिर, हावडा येथील मंदिरापासून गंगा नदीच्‍या किनार्‍यापर्यंत एक भव्‍य शोभायात्रा आयोजित करण्‍यात आली होती.

शोभायात्रेतील आदि गुरु शंकराचार्य यांची पालखी
शोभायात्रेत सहभागी सीताराम साहा

या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने श्री. सीताराम साहा सहभागी झाले होते. या शोभायात्रेत ‘प्रत्‍येक हिंदु सेना हो, प्रत्‍येक हिंदु सनातनी हो’, ‘हम भारत भव्‍य बनाएंगे, हम हिंदु राष्‍ट्र बनाएंगे !’, अशा विविध घोषणा देण्‍यात आल्‍या.