सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी !

ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी.

कडूलिंबाच्या पानाचे महत्त्व

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्त्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानानंतर कडूलिंबाच्या पानात अधिक असते.

ध्वज विजयाचा उंच धरा रे…!

लक्षावधी वर्षांपासूनची अतीप्राचीन सनातन हिंदु संस्कृती निर्माण झालेल्या सृष्टीचा आज जन्मदिवस ! ज्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली, पर्यायाने त्याच दिवशी सनातन (हिंदु) संस्कृतीची निर्मिती होण्यास आरंभ झाला.

गुढीपाडव्याला ‘मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार’ हा संकल्प करा ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी दुसरीकडे रुग्णालयात भरती असलेले रुग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे.

‘तो’ची मंगल गुढीपाडवा ।

विश्‍वाच्या प्रांगणी, उभी करा । उंच गुढी मांगल्याची ।
जी असेल चैतन्यमय आणि सात्त्विक हिंदु राष्ट्राची ॥ १ ॥

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस वर्षारंभ करण्याची नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे

ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत-संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) अन् वसंत ऋतू चालू होतो.

गुढीपाडव्याची प्राचीनता सांगणार्‍या काही कथा

नारद मुनींना ६० मुलगे झाले. प्रत्येक मुलाचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला आणि प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळेस देवांनी गुढ्या-पताका उभारून आनंदोत्सव साजरा केला.

गुढीपाडवा आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

गुढीपाडवा आणि नववर्ष यांच्या स्वागतासाठी सज्ज होत असतांना या वर्षी आपले राज्य, तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे.

हिंदूंची आणि अन्य पंथियांची कालगणना

हिंदूंची प्राचीन काळापासून चालत आलेली भारतीय कालगणना गुढीपाडव्यापासून चालू होते. वर्षातील प्रत्येक अमावास्येला चंद्र-रवि एकत्र येत असतात आणि पौर्णिमेस ते समोरासमोर येतात. चैत्र अमावास्येस चंद्र आणि रवि दोघेही मेष म्हणजे पहिल्या राशीत एकत्र असतात.

वर्षारंभी शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करून स्वभाषाभिमान जोपासा !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला हिंदूंच्या नववर्षाचा प्रारंभ होतो. त्या निमित्ताने या वर्षी मराठी भाषिकांनी शुद्ध मराठी भाषेत बोलण्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेला पाहिजे.