विश्वाच्या प्रांगणी, उभी करा । उंच गुढी मांगल्याची ।
जी असेल चैतन्यमय आणि सात्त्विक हिंदु राष्ट्राची ॥ १ ॥
सनातन हिंदु धर्म संस्कृती आहे । सर्वांना शिकण्यासाठी ।
तद्नंतर ती आहे, सान-थोरांनाही । शिकवण्यासाठी ॥ २ ॥
ईश्वर-निर्मित ती असल्याने अयोग्य आणि चुकीचे । तेथे काही नाही ।
म्हणून तिने, नराचे नरोत्तम केले । तथा नरोत्तमाचे नारायणही ॥ ३ ॥
चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेची मंगल गुढी ही । काय संदेश देते पहा ।
किती गेलात सर्वोच्च स्थानी तरी । भूमीवर पाय ठेवूनी रहा ॥ ४ ॥
डौलदार मंगल विजयगुढी ही । काहीशी झुकलेली असते ।
अहंकार नको, नम्रता हवी । असे जणू ती शिकवते ॥ ५ ॥
उंच मंगल गुढी असे सांगते । हिंदु संस्कृती आपुली सर्वोच्च ।
सर्वांना सामावून सांभाळून घेणारी । वात्सल्यमूर्ती गुरुमाऊली जणू हीच ॥ ६ ॥
जन्महिंदूंनो आणि कर्महिंदूंनो । पुढच्या पुढच्या वर्गात चला ।
आर्त, जिज्ञासू, मुमुक्षू अन् साधक ।शिष्य, सिद्ध अशी वर्ग शृंखला ॥ ७ ॥
केवळ आर्त वर्गात राहूनी । आर्त अंधारी गोंधळू नका ।
पुढील वर्गी जाऊनी ज्ञानदीप मिळवा ।गुरुकृपेने मिळेल आनंद सखा ॥ ८ ॥
गुरूंची आरती सांगते सर्वार्ंना । ज्योतीने ज्योत लावा ।
सर्व विश्व ज्ञान प्रकाशमय होईल । ‘तो’ची मंगल गुढीपाडवा ॥ ९ ॥
– श्री. द.र. पटवर्धन, कोलगाव, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग. (२२.२.२०२०)