इतरांना सेवेत साहाय्य करणारा आणि चुकांविषयी गांभीर्य असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा संभाजीनगर येथील कु. युवराज दिनेश बाबते (वय १८ वर्षे) !

त्याला कुणी चूक सांगितली, तर तो स्थिर राहून ती स्वीकारतो आणि त्यासाठी क्षमायाचनाही करतो. त्याच्या कृतीतून ‘तो स्वतःच्या चुकांकडेही तत्त्वनिष्ठतेने पहातो.’

इतरांना साहाय्य करण्यास तत्पर असलेले अन् भावपूर्ण सेवा करणारे चि. वैभव कणसे आणि प्रेमळ अन् सेवेची तळमळ असणार्‍या चि.सौ.कां. पल्लवी हेम्बाडे !

मार्गशीर्ष शुक्ल नवमी (२१.१२.२०२३) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे चि. वैभव कणसे आणि चि.सौ.कां. पल्लवी हेम्बाडे यांचा शुभविवाह होत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे सहसाधक आणि कुटुंबीय यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

सर्वांशी जवळीक साधणारे चि. अमोल बधाले आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करणारी चि.सौ.कां. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) !

उद्या, मार्गशीर्ष शुक्ल नवमी या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे चि. अमोल बधाले आणि चि.सौ.का. वैष्णवी वेसणेकर यांचा शुभविवाह आहे.

पुतण्‍याला पूर्णवेळ साधना करण्‍यास पाठिंबा देणारे आणि सनातनचे साधक अन् आश्रम यांना साहाय्‍य करणारे वेळवंड (तालुका भोर, जिल्‍हा पुणे) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) रावजी अर्जुना पांगुळ (वय ७७ वर्षे) !

वेळवंड येथील रावजी अर्जुना पांगुळ (वय ७७ वर्षे) यांचे ७.१२.२०२३ या दिवशी वारजे (पुणे) येथे कर्करोगाने निधन झाले. १९.१२.२०२३ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे.

कठीण प्रसंगातही स्थिर राहून धिराने सामोरे जाणार्‍या ६१ टक्के आध्‍यात्मिक पातळीच्या कै. वैद्या (सुश्री) सुजाता जाधव !

‘कोल्‍हापूर येथील सनातनच्‍या साधिका कै. वैद्या (सुश्री) सुजाता जाधव यांचे २७.७.२०२३ या दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी निधन झाले. त्यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमळ आणि इतरांना साहाय्य करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. मनीषा राऊत (वय २६ वर्षे)!

‘सेवांमध्ये सुसूत्रता यावी आणि सेवा करतांना काही अडचण येऊ नये’, यासाठी मनीषा कार्यपद्धतीचा अभ्यास करते.

सेवेची तीव्र तळमळ, गुर्वाज्ञापालन आणि गुरूंवर दृढ श्रद्धा असलेले रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. यशवंत कणगलेकर (वय ७५ वर्षे) !

काकांचा सनातन संस्थेच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास आहे. ते ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी कोणत्या ग्रंथात अध्यात्मातील कोणते सूत्र किंवा तत्त्व लिहिले आहे’, हे लगेच सांगतात. ते ग्रंथात सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे स्वतः कृती करण्याचाही प्रयत्न करतात.

आनंदी, प्रेमळ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाट्ये (रत्नागिरी) येथील (कै.) दशरथ एकनाथ भाटकर !

‘दशरथ एकनाथ भाटकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने १५.१०.२०२३ या दिवशी निधन झाले. आज १३ डिसेंबर या दिवशी त्यांचे दुसरे मासिक श्राद्ध आहे.

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. काणे महाराज यांची समर्पणभावाने सेवा करणारे अन् सर्वांसमोर गुर्वाज्ञापालनाचा आदर्श ठेवणारे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील कै. शशिकांत मनोहर ठुसे (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ८१ वर्षे) !

उद्या म्हणजे १०.१२.२०२३ या दिवशी कै. शशिकांत मनोहर ठुसे यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे, त्या निमित्ताने…

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. काणे महाराज यांची समर्पणभावाने सेवा करणारे अन् सर्वांसमोर गुर्वाज्ञापालनाचा आदर्श ठेवणारे ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील (कै.) शशिकांत मनोहर ठुसे (वय ८१ वर्षे) !

प.पू. भक्तराज महाराज यांचे निस्सीम भक्त आणि प.पू. काणे महाराज यांची २५ वर्षे अविरत सेवा करणारे शशिकांत मनोहर ठुसे यांची पू. शिवाजी वटकर यांना त्यांच्याविषयी जाणवलेली अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.