१. इतरांना सेवेत साहाय्य करणे
अ. दळणवळण बंदीच्या काळात आम्हाला सर्व कामे घरीच करावी लागत होती. त्या वेळी युवराज सकाळी लवकर उठून बहिणीला घर झाडणे, भांडी धुणे, ती जागेवर लावणे, भाजी चिरून देणे, पलंगपोस पालटणे इत्यादी कामात साहाय्य करत होता.
आ. आमच्या घरी शिबिर असतांना तो सेवाकेंद्राची स्वच्छता करण्याची आणि आवश्यक असलेले साहित्य आणून देण्याची सेवा करायचा.
इ. तो सनातनच्या पंचांगांचे गठ्ठे आवश्यक तेथे नेऊन पोचवतो.
ई. तो आम्हाला भ्रमणभाषवरून ‘ऑनलाईन’ सत्संगांची जोडणी करून देणे, युवा आणि बाल साधकांच्या सत्संगात भ्रमणभाषवर नियमित नामजप लावणे, या सेवांचे नियोजन सहसाधकांशी चर्चा करून करतो.
उ. त्याला संगणकीय ज्ञान चांगले आहे. शिबिराच्या वेळी तो त्याच्या वडिलांना संगणकीय प्रणालीवर जोडणी करण्यास साहाय्य करतो.
२. अभ्यासू वृत्ती
युवराजला अंतराळशास्त्र विज्ञानाची पुष्कळ आवड आहे. त्यावरचे काही चलचित्रपट पाहून आणि माहिती वाचून तो ते लगेच आत्मसात करतो.
३. चुकांविषयी गांभीर्य असणे
३ अ. ‘चुका कशा लिहायच्या ? प्रत्येक प्रसंगात आपल्यातील स्वभावदोष कसे ओळखायचे ?’ हे त्याने शिकून घेतले आणि त्यानुसार तो मला आढावा देतो.
३ आ. स्वतःच्या चुका तत्त्वनिष्ठपणे सांगणे आणि इतरांनाही शांतपणे चुकांची जाणीव करून देणे : ‘युवराज कुटुंबातील सर्वांना शांतपणे चुकांची जाणीव करून देतो. माझ्याकडून कधी निरोप देण्यात चूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले, तर तो मला तत्त्वनिष्ठतेने माझ्या चुकीची जाणीव करून देतो. तो एखाद्या प्रसंगात त्याचे ‘काही चुकले का ?’ असेही विचारतो. त्याला कुणी चूक सांगितली, तर तो स्थिर राहून ती स्वीकारतो आणि त्यासाठी क्षमायाचनाही करतो. त्याच्या कृतीतून ‘तो स्वतःच्या चुकांकडेही तत्त्वनिष्ठतेने पहातो’, असे मला शिकायला मिळते.
४. त्याने ‘भावजागृतीचे प्रयत्न कसे करायचे ?’, हे शिकून घेतले आणि तो मला त्याप्रमाणे प्रतिदिन आढावाही देतो.
५. संतांप्रती भाव
अ. सद्गुरु नंदकुमार जाधवकाका आमच्याकडे निवासाला आले की, त्याला आनंद होतो. तो त्यांचे मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकतो, तसेच तो सद्गुरु काकांनी सांगितलेले व्यष्टी साधनेचे प्रयत्नही करतो.
आ. तो नेहमी महाविद्यालयात जातांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राचे दर्शन घेतो.
६. स्वभावदोष
आळशीपणा, अव्यवस्थितपणा आणि स्वतःच्या मतावर ठाम रहाणे
‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मला या युवासाधकाचा सहवास मिळाला. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. अक्षरा दिनेश बाबते (वय ४९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), (कु. युवराजची आई), संभाजीनगर (२५.४.२०२२)