चि. वैभव कणसे यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५९ वर्षे)
१ अ. ‘वैभवदादाचा स्वभाव शांत आणि नम्र आहे.
१ आ. दादाकडे कुठल्याही सेवेसाठी कधीही साहाय्य मागितले, तरी तो तत्परतेने साहाय्य करतो.
१ इ. सेवेची तळमळ : दादा दूरच्या प्रवासावरून आला, तरी आवश्यकता असल्यास पनवेलजवळच्या ठिकाणांच्या वितरकांना सात्त्विक उत्पादने देण्यासाठी वाहन घेऊन जायला सिद्ध असतो.
१ ई. संतांचे आज्ञापालन करणे : ६ – ७ वर्षांपासून जसजसा संस्थेच्या कार्याचा विस्तार वेगाने वाढत गेला, तसतशा वितरकांच्या सात्त्विक उत्पादनांच्या मागण्याही वाढत गेल्या. त्यामुळे सात्त्विक उत्पादने मोठ्या वाहनातून (शक्तीरथातून) पाठवणे निकडीचे झाले. त्या वेळी अवजड वाहन चालवणारे साधक नसल्यामुळे इतर जिल्ह्यांतून तसे चालक शोधावे लागायचे. त्या वेळी सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांनी साधकांना सांगितले, ‘‘आता उत्पादनांच्या संदर्भातील सेवेतील साधकांनीच अवजड वाहने शिकून घ्यायला हवीत.’’ त्याप्रमाणे साधक अवजड वाहन चालवायला शिकले. त्यांतील वैभवदादा एक होता. त्याने अल्प कालावधीत अवजड वाहन शिकून घेतले आणि तो आत्मविश्वासाने ते चालवू लागला.
१ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
१. दादा शक्तीरथ (टीप) घेऊन मासातून न्यूनतम २ – ३ वेळा तरी वितरकांना सात्त्विक उत्पादने देण्यासाठी ठिकठिकाणी जातो. त्या वेळी तो ऊन, पाऊस आणि थंडी यांची तमा बाळगत नाही. ‘एवढे सर्व तुला कसे जमते ?’, असे त्याला विचारल्यावर तो म्हणतो, ‘‘हे केवळ गुरूंच्या कृपेनेच शक्य आहे.’’
टीप – सात्त्विक उत्पादनांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणारे सनातन संस्थेचे अवजड वाहन.
२. कोरोना महामारीच्या काळात दादा गुरूंवरील श्रद्धेमुळे एका आश्रमातून दुसर्या आश्रमात जीवनावश्यक वस्तूंची देवाण-घेवाण करण्याची सेवा करत असे. त्या वेळी ‘परम पूज्य माझ्या समवेत आहेत’, असा त्याचा भाव असायचा.’
२. श्री. कौस्तुभ येळेगावकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५५ वर्षे) आणि श्री. रामचंद्र पांगुळ
२ अ. उत्तम निरीक्षणक्षमता : ‘बाजारात एखादे आधुनिक यंत्र दिसले, तर तो ‘त्या यंत्राचा उपयोग साधनेत किंवा सेवेत कसा करून घ्यायचा ?’, याविषयी अभ्यासपूर्ण सूचना मांडतो. ‘सर्व प्रकारच्या सेवांमध्ये कोणत्या ठिकाणी आधुनिक यंत्रे वापरता येऊ शकतात ?’, याविषयीचे त्याचे निरीक्षण चांगले असते.
२ आ. सेवेची तळमळ
२ आ १. पुढाकार घेऊन सेवा करणे : सात्त्विक उत्पादनांची ने-आण करण्यासाठी अवजड वाहन (शक्तीरथ) विकत घ्यायचे होते. त्या वेळी वैभवने ‘बाजारात कोणती वाहने उपलब्ध आहेत ? आपण कोणते वाहन पुढील काही वर्षांसाठी वापरू शकतो ?’ इत्यादींचा अभ्यास केला आणि अन्य साधकांच्या समवेत त्या संबंधित सर्व माहिती गोळा करण्याची सेवा चिकाटीने आणि कौशल्याने पूर्ण केली. शक्तीरथ खरेदी करून आश्रमात आणण्यात दादाचा मोठा सहभाग होता.
२ आ २. शक्तीरथाशी संबंधित सेवा भान हरपून आणि समर्पणभावाने करणे : ‘शक्तीरथ म्हणजे आश्रम आहे’, असे त्याला वाटते. त्यामुळे शक्तीरथ धुणे, त्याची दुरुस्ती करणे’ इत्यादी सेवा तो मनापासून करतो. त्या वेळी त्याला कशाचेही भान राहिलेले नसते. तो समर्पणभावाने सेवा करण्याचा प्रयत्न करतो.
२ आ ३. सेवेतील अडचणी सोडवण्यासाठी त्याला चांगल्या उपाययोजना सुचतात. त्याने सुचवलेल्या उपाययोजनांप्रमाणे कृती केल्यामुळे सेवा अल्प वेळेत पूर्ण होते.
२ इ. साधकांना आधार वाटणे : सेवा करत असतांना तो इतरांचा विचार करतो. त्यामुळे साधकांना त्याचा आधार वाटतो. तो सर्वांना साहाय्य करतो. त्याच्या या स्वभावामुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो.
२ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : त्याने लहान वयात पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या कौटुंबिक अडचणींना सामोरे जाऊन साधना चालू ठेवली. त्यामुळे ‘श्री गुरूंनी मला सर्व कठीण प्रसंगांतून बाहेर काढून साधनारत ठेवले आहे’, असा त्याचा भाव असतो.’
३. श्री. प्रशांत कावरे
३ अ. प्रेमभाव
१. ‘शक्तीरथाच्या प्रवासात कधी धर्माभिमानी किंवा हितचिंतक यांनी अर्पण दिले, तर तो त्यांना आश्रमातून आणलेला प्रसाद देतो, तसेच सहसाधकालाही त्याविषयी आठवण करून देतो.
२. शक्तीरथाच्या प्रवासात तो मला नेहमी ‘तू दमला आहेस का ? तुला विश्रांती हवी आहे का ?’, असे विचारतो. यामुळे प्रवासात मला त्याचा आधार वाटतो.
३ आ. शिकण्याची वृत्ती : वैभवने अल्प कालावधीत शक्तीरथ चालवायची सेवा शिकून घेतली. त्याने शक्तीरथाच्या दुरुस्तीची सेवा बारकाईने शिकून घेतल्या आणि त्यानुसार तो रथाच्या दुरुस्त्या नियमित करतो.
३ इ. स्थिरता : प्रवासात कधी अडचण आली, तर ‘स्थिर राहून अडचण कशी सोडवू शकतो ?’, असा त्याचा विचार असतो. त्या वेळी तो स्थिर राहून प्रसंग हाताळतो.
३ ई. साधकांना साधनेत साहाय्य करणे : वैभव माझा आध्यात्मिक मित्र आहे. तो मला माझ्या चुका तत्त्वनिष्ठपणे सांगतो, तसेच भावजागृतीचे प्रयत्न करण्यास सांगून ‘स्वभावदोषांवर कशी मात करायला पाहिजे ?’, हेही सांगतो.
३ उ. भाव
३ उ १. शक्तीरथाविषयीचा भाव : तो शक्तीरथाची स्वच्छता नियमितपणे करतो. स्वच्छता झाल्यावर तो नेहमी म्हणतो, ‘‘आता रथाचा चेहरा हसरा जाणवतो !’’ यातून ‘रथ म्हणजे गुरूंचा एक साधक आहे’, असा त्याचा भाव आहे’, असे जाणवते. तो सणांच्या वेळी शक्तीरथ फुलांनी सजवतो.
३ उ २. प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रतीचा भाव : शक्तीरथ चालवत असतांना तो भ्रमणभाषवर प.पू. भक्तराज महाराज यांची भजने चालू ठेवतो. ती ऐकत असतांना त्याची भावजागृती होते. तो प्रवासात प.पू. भक्तराज महाराज यांच्या संदर्भातील ग्रंथातील काही प्रसंग सांगत असतो.
३ उ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
अ. प्रवासात जेव्हा आम्ही गुरुदेवांविषयी बोलतो, तेव्हा तो म्हणतो, ‘‘आपल्याला गुरुदेव मिळाले आहेत’, हे आपले भाग्य आहे. ते आहेत; म्हणून आपण सगळ्या संघर्षातून तरून जाऊ शकतो.’’
आ. तो ‘प्रत्येक सेवा आणि कृती प.पू. गुरुदेवांना आवडेल, अशी कशा प्रकारे करू शकतो ?’, याचा विचार करतो आणि त्याप्रमाणे कृती करतो.’
४. श्री. पुष्कर अरगडे
४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : ‘तो सतत गुरुदेवांचे स्मरण करतो. त्याच्यातील भावामुळे त्याला गुरुदेवांविषयी अनेक अनुभूती येतात. ‘गुरुदेव स्वप्नात येऊन माझ्याशी बोलतात आणि मला मार्गदर्शन करतात’, असे तो नेहमी म्हणतो. त्याच्या या अनुभूती ऐकल्यावर माझीही भावजागृती होते.’
५. सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर
५ अ. अल्प अहं : ‘वैभवला सेवेच्या निमित्ताने अनेकदा रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळते. याविषयी साधक त्याला म्हणतात, ‘‘तू किती भाग्यवान आहेस !’’; पण त्याला त्याचा अहं नसतो. तो म्हणतो, ‘‘माझे साधनेचे प्रयत्न न्यून पडतात; म्हणून देवच मला तेथे बोलावून प्रयत्नांसाठी शक्ती देतो. त्याच्या कृपेमुळेच मला तेथे जाता येते.’’
५ आ. भाव
५ आ १. प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रतीचा भाव
अ. वैभवला शक्तीरथ घेऊन महाराष्ट्रात आणि अन्य राज्यांत सेवेसाठी जावे लागते. सलग ८ ते १० दिवस रथ चालवूनही ‘तो पुष्कळ दमला आहे’, असे सहसा होत नाही. रथ घेऊन रात्री आश्रमात आल्यावरही तो लगेचच सकाळी सेवेला येतो. एकदा मी त्याला याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘प.पू. भक्तराज महाराजच रथ चालवतात’, असे मला जाणवत असते. मग मी कसा थकणार ? तेच मला शक्ती देतात.’’
आ. एकदा त्याने रथातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला वाहिलेले फूल वर्षभर टवटवीत राहिले होते, तसेच त्याला सुगंधही येत होता.
५ आ २. परात्पर गुरुदेव आणि शक्तीरथ यांच्याप्रतीचा भाव : कोरोना महामारीच्या प्रारंभीच्या कालावधीत शक्तीरथ घेऊन जिल्ह्यात ठिकठिकाणी जाण्यास पुष्कळ बंधने होती. प्रतिदिन अलगीकरणात रहाणे शक्य नसल्याने रथाच्या समवेत जाणार्या २ साधकांना साधारणतः १५ दिवस आणि रात्र रथातच रहावे लागले होते.
याविषयी वैभव म्हणाला, ‘‘हे १५ दिवस कसे गेले ?’, ते कळलेच नाही. नेहमीपेक्षा पुष्कळ प्रतिकूल परिस्थिती होती; पण परात्पर गुरुदेवांनीच शक्ती दिल्याने आम्ही तेथे राहू शकलो, अन्यथा हे कठीण होते. आम्हाला कोणताही त्रास झाला नाही. ‘मी शक्तीरथात नसून आश्रमातच वास्तव्यास आहे’, असे मला वाटत होते.’’
बाहेरगावाहून बर्याच दिवसांनी आश्रमात आल्यावर शक्तीरथ पाहिल्याविना त्याला चैन पडत नाही.’
चि.सौ.कां. पल्लवी हेम्बाडे यांची त्यांचे कुटुंबीय आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. सौ. शोभा हेम्बाडे (चि.सौ.कां. पल्लवी यांची आई, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), श्री. अनिल हेम्बाडे (वडील) आणि श्री. देवेंद्र हेम्बाडे (लहान भाऊ), जळगाव अन् सौ. अक्षरा शिंदे (मोठी बहीण)
१ अ १. प्रेमभाव : ‘देवद आश्रमात पल्लवीच्या समवेत वृद्ध साधिका रहातात. ती त्यांची प्रेमाने काळजी घेते, तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन सोडवते. घरी आल्यावरही ती तिच्या मतीमंद बहिणीला (कु. प्रज्ञा हेम्बाडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३१ वर्षे) हिला)) प्रेमाने सांभाळते.
१ अ २. नियोजनबद्ध कृती करणे : पल्लवीची सर्व कामे नियोजनबद्ध असतात. त्यामुळे ‘त्यांतील काही गोष्टी राहिल्या किंवा विसरल्या’, असे होत नाही. तिच्या सेवांचे नियोजन आधीच ठरलेले असते. त्यामुळे ऐन वेळी तिची धावपळ होत नाही.
१ अ ३. तत्त्वनिष्ठता : आमच्या चुका तिच्या लक्षात आल्यास ती भावनिक स्तरावर न रहाता आम्हाला तत्त्वनिष्ठपणे चुका सांगते.’
१ आ. सौ. अक्षरा शिंदे (चि.सौ.कां. पल्लवी यांची मोठी बहीण)
१ आ १. परिस्थिती स्वीकारणे
अ. ‘आई आजारी असतांना पल्लवीला बर्याच वेळा आश्रमातून घरी यावे लागते. तेव्हा ती परिस्थिती मनापासून स्वीकारते. ती घरातील सर्व कामे करून प्रेमाने आईची काळजी घेते.
आ. गेल्या वर्षी बाबांचा अपघात झाला होता. तेव्हा पल्लवी आश्रमातून घरी आली होती. ती प्रज्ञाला (मतीमंद बहिणीला) सांभाळून घरातील सर्व कामे करत होती.
इ. प्रज्ञाला सांभाळतांना ती ऐकत नसल्यास पल्लवी पुष्कळ संयमाने तिला हाताळते.’
२. दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणारे सर्व साधक
२ अ. उत्तम स्मरणशक्ती : ‘पल्लवी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संरचनेची (फॉरमॅटिंगची) सेवा करते. पूर्वी प्रसिद्ध केलेल्या दैनिकाच्या विशेषांकांतील काही संदर्भ चित्रे किंवा लिखाण काही कालावधीनंतर हवे असल्यास पल्लवी ‘ते चित्र किंवा लिखाण कुठल्या दिवशीच्या दैनिकात आणि कुठल्या पृष्ठावर प्रसिद्ध केले होते ?’, हे लगेच सांगते.
२ आ. स्वतःला पालटण्याची तळमळ : पल्लवी देवद आश्रमातील वयस्कर साधिकांच्या समवेत रहात होती. काही वेळा तिला त्यांच्याशी जुळवून घेणे जमत नसे. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्यानुसार तिने प्रयत्न केले. आता ती वयस्कर साधिकांच्या स्थितीला जाऊन त्यांना समजून घेते आणि त्यांना साहाय्य करते. त्यामुळे तिने वयस्कर साधिकांचा विश्वास संपादन केला आहे. ती आश्रमात नसतांनाही खोलीतील साधिका तिची आठवण काढतात.
२ इ. सेवेची तळमळ : दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा काही वेळा सलग ६ – ७ घंटे किंवा त्यांहून अधिक वेळ बसून करावी लागते. पल्लवी दिवसभर न कंटाळता सलग सेवा करू शकते.
२ ई. भाव
१. ‘परात्पर गुरुदेवांनी आपल्यासाठी आतापर्यंत पुष्कळ केले आहे आणि अजूनही करत आहेत’, याविषयी मनात कृतज्ञता बाळगून ती साधनेचे प्रयत्न करते.
२. ‘एखाद्या प्रसंगी गुरुदेवांनी केलेले साहाय्य, रामनाथी आश्रमात अनुभवलेले भावक्षण, तसेच संतांच्या सहवासातील क्षण’ इत्यादी आठवून ती कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते.
३. एखादी सेवा जमत नसल्यास अथवा स्वीकारता येत नसल्यास ती देवाचे साहाय्य घेते. ‘यातून देवच मार्ग दाखवणार आहे’, असा तिचा भाव असतो.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १२.१२.२०२३)