‘कोल्हापूर येथील सनातनच्या साधिका कै. वैद्या (सुश्री) सुजाता जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४१ वर्षे) यांचे २७.७.२०२३ या दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी निधन झाले. त्यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. कै. वैद्या (सुश्री) सुजाता जाधव यांना भेटून आनंद होणे
नोव्हेंबर २०२२ मध्ये मी माझ्या कुटुंबियासमवेत (मी, माझे यजमान, मुलगा, मुलगी, जावई आणि २ नाती) रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. तेथे आम्हाला कै. वैद्या (सुश्री) सुजाता जाधव भेटल्या होत्या. आम्हाला पाहून त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी २ – ३ वेळा म्हटले, ‘‘काकी, तुम्ही भेटलात. मला पुष्कळ बरं वाटलं.’’ मी त्यांना २ ते अडीच वर्षांनी भेटत होते. मलाही त्यांना भेटून पुष्कळ आनंद झाला.
२. चेहर्यावर व्याधीच्या परिणामाचा लवलेशही न दिसणे
त्या वेळी मला ‘त्या गंभीर आजारी आहेत’, याची जराही कल्पना नव्हती. त्यांच्या चेहर्यावर व्याधीच्या परिणामाचा लवलेशही दिसत नव्हता. ही माझी आणि त्यांची अखेरची भेट ठरली.
३. कठीण प्रसंगात स्थिर राहून धिराने सामोरे जाणे
त्यांची व्याधी आणि निधन यांविषयी ऐकून मला मोठा धक्काच बसला. ‘त्यांचे कठीण प्रसंगात स्थिर राहून धिराने सामोरे जाणे’, आम्हाला पुष्कळ शिकवून गेले. ‘त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले’, असे मला वाटले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अशा साधकांना घडवले, याबद्दल ईश्वर चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. विजया मंगरूळकर, गडहिंग्लज, कोल्हापूर. (१२.८.२०२३)