प्रेमळ आणि इतरांना साहाय्य करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. मनीषा राऊत (वय २६ वर्षे)!

उद्या, मार्गशीर्ष शुक्ल पंचमी (१७.१२.२०२३) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणार्‍या कु. मनीषा राऊत यांचा २६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त होमिओपॅथी वैद्या आरती तिवारी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. मनीषा राऊत

कु. मनीषा राऊत यांना २६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

१. प्रेमभाव : ‘कु. मनीषा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील साधकांशी प्रेमाने बोलते. ती त्यांच्याकडून प्रेमाने सेवा करून घेते. ती त्यांची विचारपूस करून त्यांना साहाय्य करते. ती सर्वांची प्रकृती समजून घेऊन त्यांच्याशी जुळवून घेते.

२. सतर्कता : सेवेअंतर्गत कोणतीही अडचण आली, तर सतर्क राहून त्यावर उपाय सुचवते.

३. अभ्यासू आणि शिकण्याची वृत्ती : ‘सेवांमध्ये सुसूत्रता यावी आणि सेवा करतांना काही अडचण येऊ नये’, यासाठी मनीषा कार्यपद्धतीचा अभ्यास करते. त्याविषयी संबंधित दायित्व असणार्‍या साधकांना विचारून ती त्यांच्याकडून शिकून घेते.

४. इतरांना साहाय्य करणे 

अ. सर्व जण तिच्याकडे हक्काने साहाय्य मागतात; कारण ‘ती साहाय्य करीलच’, याची सर्वांना निश्चिती असते.

आ. मनीषाच्या आई-वडिलांना तिचा आधार वाटतो. ते तिला मनमोकळेपणाने स्वतःच्या अडचणी सांगतात आणि मनीषा त्यांना तत्परतेने साहाय्य करते.

५. मनीषा साधकांच्या चुका तत्त्वनिष्ठपणे सांगते.

६. स्थिरता : कुणीही काही सूत्र किंवा अडचण सांगत असल्यास मनीषा ते शांतपणे समजून घेते आणि ‘त्यावर काय करू शकतो ?’, याचा विचार करून मगच त्याविषयी कृती करते. ती स्थिर राहून सर्व करत असते.

७. जाणवलेला पालट : पूर्वी तिच्या बोलण्यात काही प्रमाणात बहिर्मुखता असायची; पण आता तिने त्यावर प्रयत्न केल्याने तिच्या बोलण्याचे कुणाला वाईट वाटत नाही.’

– होमिओपॅथी वैद्या आरती तिवारी, नागेशी, गोवा. (१६.११.२०२३)