राज्यातील ५ राष्ट्रीयीकृत बँकांतील १२ प्रकरणांत १३ सहस्र २५७ कोटी रुपयांचा अपव्यहार आणि फसवणूक !

अर्थसंकल्पावरील अनुदान मागण्यांवर चर्चा करतांना भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, वरील बँकेतील पैसा हा सामान्य माणसाचा असून त्याचा अपहार झाला आहे.

जनतेचे पैसे वापरून जनतेलाच आमीष दाखवणारे सर्व राजकीय पक्ष !

‘निवडणुकांच्या वेळी सर्वच राजकीय पक्ष जनतेला विविध सुविधा देण्याचे आमीष दाखवतात. त्यात तो पक्ष स्वतःचा एकही पैसा खर्च करत नाही आणि जनताही त्यांच्या या आमिषांना भुलते. विशेष म्हणजे, भारतातील लोकशाहीत हा फसवेगिरीचा खेळ गेली ७४ वर्षे चालू आहे ! हे कुणाच्याच लक्षात आलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘मुंबई नर्सिंग होम’ कायद्यात सुधारणा करून येत्या ३ मासांत बोगस प्रयोगशाळांवर नियंत्रण आणणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात बोगस ‘पॅथॉलॉजी’ प्रयोगशाळांद्वारे मोठ्या प्रमाणात लूट चालू असतांना अद्याप त्यावर ठोस कारवाई न हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणाचे लक्षण होय !

आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात संरक्षण मिळण्यासाठी आमदार प्रसाद लाड यांची न्यायालयात याचिका !

प्रसाद लाड यांच्यावर वर्ष २००९ मध्ये मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा आदेश !

मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने दिले आहेत.

धर्मांध आर्किटेक्टने ‘देवेश’ बनून हिंदु मुलीशी लग्न केले आणि ७ वर्षे घरात डांबून केले अत्याचार !

उच्च शिक्षित असल्याने धर्मांधांची जिहादी मानसिकता पालटत नाही, हे लक्षात घेऊन हिंदु मुलींनी धर्मांध मुलांपासून सावध रहा आवश्यक आहे !

पुणे येथे ‘एम्.बी.ए.’च्या बनावट पदवी आणि गुणपत्रिका देणार्‍या दोघांना अटक !

शैक्षणिक क्षेत्रातील वाढते घोटाळे नवीन पिढीला बरबाद करत आहेत, हे लक्षात घेऊन घोटाळा करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.  बनावट पदवी देऊन तरुणाईला बिघडवण्याचे काम करणारे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.

संभाजीनगर येथे पूजेच्या नावाखाली साडेपाच तोळे दागिने पळवणार्‍या धर्मांध भोंदू दांपत्याला अटक !

अबिद रशीद आणि नगिना खान (दोघेही गाझियाबाद, देहली येथील रहिवासी) अशी त्या भोंदूंची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दुकानदार आणि विक्रेते यांना १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनात आणलेली १० रुपयांची नाणी वैध असतांना समाजात पसरलेल्या अपसमजांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात. ही नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी १० रुपयांची चलनी नोट देण्यासाठी अडवणूक करतात.

नंदुरबार येथे ॲक्सिस बँकेतील कर्मचार्‍याने एका महिलेची केली ५ लाख रुपयांची फसवणूक !

ॲक्सिस बँकेतील रोखपाल (कॅशिअर) तथा अधिकारी दिनेश सोनार यांनी येथील जळका बाजार चौक येथे रहाणार्‍या नंदिनी चौधरी यांना बनावट ठेव पावती देऊन ५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.