आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात संरक्षण मिळण्यासाठी आमदार प्रसाद लाड यांची न्यायालयात याचिका !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कथित फसवणुकीच्या जुन्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यात त्यांनी पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ‘एका कंत्राटात फसवणूक झाल्याच्या कारणाखाली ५ वर्षांपूर्वी तक्रार प्रविष्ट झाली होती. नंतर ते प्रकरण संपले होते. आता पुन्हा ते उकरून काढून आपल्याविरुद्ध कारवाई करण्याचा घाट घातला जात आहे’, अशी भीती प्रसाद लाड यांनी याचिकेतून व्यक्त केली आहे.

आमदार प्रसाद लाड

प्रसाद लाड यांच्यावर वर्ष २००९ मध्ये मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वर्ष २०१४ मध्ये त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. प्रसाद लाड यांना मागील वर्षी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले होते.