
नंदुरबार – ॲक्सिस बँकेतील रोखपाल (कॅशिअर) तथा अधिकारी दिनेश सोनार यांनी येथील जळका बाजार चौक येथे रहाणार्या नंदिनी चौधरी यांना बनावट ठेव पावती देऊन ५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सोनार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२० मार्च २०१८ या दिवशी दिनेश सोनार यांनी नंदिनी चौधरी यांच्या घरी जाऊन ॲक्सिस बँकेतील ५ वर्षांसाठी ठेव पावती सिद्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडून ५ लाख रुपयांचा धनादेश घेतला, त्यानंतर त्यांनी ॲक्सिस बँकेची ५ लाख रुपयांची बनावट ठेव पावती करून ती चौधरी यांना दिली; परंतु ही गोष्ट ४ वर्र्षांनंतर ठेव पावतीची रक्कम काढण्यासाठी गेल्यानंतर उघडकीस आली आहे. नंदिनी यांनी २५ मार्च २०२१ या दिवशी बँकेत जाऊन ॲक्सिस बँकेतील अधिकारी राहुल दुसाने यांना ठेव पावती दाखवल्यानंतर त्यांनी ही पावती बनावट आहे, असे सांगितले. त्यानंतर दिनेश सोनार यांना दूरभाष करून विचारल्यानंतर ‘कुणाला काही सांगू नका, मी तुम्हाला भेटतो. सध्या माझ्याकडे पैसे नसून पैसे आल्यावर परत करतो’, असे आश्वासन दिले; परंतु अद्यापर्यंत त्यांनी पैसे परत न केल्यामुळे बँकेच्या वतीने सोनार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)