भारतातील लोकप्रतिनिधींचे खरे स्वरूप जाणा !
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार तृणमूल काँग्रेसच्या आमदार ज्योत्स्ना मंडी यांची वर्ष २०१६ मध्ये असलेली १ लाख ९६ सहस्र रुपये इतकी संपत्ती वर्ष २०२१ मध्ये ४१ लाख रुपये झाली आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार तृणमूल काँग्रेसच्या आमदार ज्योत्स्ना मंडी यांची वर्ष २०१६ मध्ये असलेली १ लाख ९६ सहस्र रुपये इतकी संपत्ती वर्ष २०२१ मध्ये ४१ लाख रुपये झाली आहे.
तेलंगाणा सरकारच्या ‘तेलंगाणा सोशल वेल्फअर रेसीडेंशियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सोसायटी’चे सचिव प्रवीण कुमार यांनी हिंदु विद्यार्थ्यांना ‘मी राम, कृष्ण यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. हिंदु धर्म आणि परंपरा यांचे पालन करणार नाही’ अशी शपथ दिली आहे.
बांगलादेशातील हिंदूंच्या नौगाव या गावावर हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या सहस्रो धर्मांधांनी आक्रमण करून हिंदूंच्या ८८ घरांची नासधूस केली, तर ८ मंदिरांची तोडफोड केली. तसेच येथे लूटमारही करण्यात आली.
ईश्वराच्या सांगण्यानुसार विवाह म्हणजे एक महिला आणि पुरुष यांच्यामधील आयुष्यभरासाठी स्वखुशीने एकत्र येण्याची पद्धत आहे. त्यामुळेच ईश्वर समलैंगिक विवाहांंसारख्या ‘वाईट गोष्टीं’ना आशीर्वाद देत नाही, असे व्हॅटिकन चर्चने स्पष्ट केले आहे.
पाकमध्ये मागील वर्षी धर्मांधांच्या जमावाने हिंदूंच्या प्राचीन मंदिराची आणि तिथे असलेल्या श्री परमहंसजी महाराज यांच्या समाधीची तोडफोड, तसेच जाळपोळही केली होती. या प्रकरणी आता येथील हिंदूंनी या जमावाला क्षमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. तसेच १ सहस्रहून अधिक मदरसेही बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षामंत्री सरथ वीरशेखर यांनी दिली.
तमिळनाडूतील ११ सहस्र ९९९ मंदिरांमध्ये आर्थिक संकटामुळे एकदाही पूजा करण्यात येत नाही. ३७ सहस्र मंदिरांमध्ये पूजा, देखभाल, सुरक्षा, स्वच्छता यांचे दायित्व एकाच व्यक्तीवर आहे, अशी माहिती सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी दिली.
शबरीमला मंदिरामध्ये वर्ष २०१८ मध्ये महिलांच्या प्रवेशाला देण्यात आलेली अनुमती एक बंद अध्याय आहे. असे व्हायला नको होते, अशा शब्दांत केरळचे माकपच्या सरकारमधील मंत्री के. सुरेंद्रन् यांनी निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी खेद व्यक्त केला आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदु महासभेचे २ पुरुष कार्यकर्ते आणि १ महिला पदाधिकारी यांनी ताजमहालमध्ये जाऊन शिवपूजन केले. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. ताजमहाल हे तेजोमहालय नावाचे शिवमंदिर असल्याची हिंदूंची भावना आहे.
देशाची सध्याची सुरक्षेची स्थिती अस्थिर आणि अनिश्चित आहे. अशा वेळी संपूर्ण सैन्याने युद्धाची सिद्धता वाढवावी आणि क्षमतेच्या विस्तारासाठी समन्वय करावा, असे आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याला केले आहे.