याला सर्वधर्मसमभाव म्हणायचा का ?

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सैरया भागामध्ये होळीच्या दिवशी मुसलमान व्यक्तीवर रंग उडल्याने झालेल्या वादातून धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. यात काही हिंदू घायाळ झाले. पोलिसांनी अजीम आणि आसिम यांना अटक केली आहे.

आतंकवाद्यांचा बचाव करणारे आता कुठे आहेत ?

गुजरातमधील इशरत जहाँ चकमकीच्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३ पोलीस अधिकार्‍यांची निर्दोष मुक्तता केली. ‘इशरत जहाँ ही आतंकवादी नव्हती, याचे कोणतेही पुरावे नाहीत’, असेही न्यायालयाने म्हटले.

बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

बांगलादेशातील महंमदपूर उपजिल्ह्यात असणार्‍या ४०० वर्षे प्राचीन परुर्कुल अष्टग्राम महा स्मशान आणि राधा गोबिंद आश्रम धर्मांधांनी जाळला. यामुळे येथील रथ आणि देवतांच्या मूर्ती भस्मसात झाल्या.

अशा घटना कधी थांबणार ?

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथील शिकारपूरमध्ये अशोक कुमार नावाच्या एका पुजार्‍याची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

असे कायदे संपूर्ण भारतातही हवेत !

जर आसाममध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले, तर ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदा केला जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एका सभेमध्ये दिले.

जनतेला मद्यपी बनवणारे शासनकर्ते नकोत !

साम्यवाद्यांची सत्ता असलेल्या केरळमध्ये मागील ५ वर्षांत झालेल्या मद्यविक्रीचे मूल्य ६५ सहस्र कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. मद्याच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकारात हे सूत्र उघडकीस आले आहे.

हिंदू मुसलमानांकडून धर्माभिमान शिकतील का ?

ब्रिटनच्या बॅटले ग्रामर स्कूलमध्ये शार्ली हेब्दो या मासिकात प्रसिद्ध झालेले महंमद पैगंबर यांचे चित्र असलेला अंक शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्याने मुसलमानांनी निदर्शने केली. यामुळे मुख्याध्यापकांनी क्षमा मागत शिक्षकाला निलंबित केले.

अशी इच्छा असणार्‍या पाकमध्ये पाठवा !

जर भारतातील ३० टक्के मुसलमान संघटित झाले, तर भारतात ४ नवीन पाकिस्तान बनवले जाऊ शकतात, असे विधान तृणमूल काँग्रेसचे धर्मांध नेते शेख आलम यांनी बंगालमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा प्रसार करतांना केले.

अशा प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करा !

होळीमध्ये लोक मद्यपान करतात. तो अमली पदार्थांचे सेवन करण्याचाही उत्सव आहे. याची माहिती मिळाली, तर पोलिसांना द्यावी, असे आवाहन उत्तरप्रदेशातील फरुखाबादचे दंडाधिकारी अशोककुमार मौर्य यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.

अशा घटना कधी थांबणार ?

बदायू (उत्तरप्रदेश) येथील मिहौना गावामध्ये एका साधूंची अमानुषपणे हत्या करून त्यांचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याची घटना समोर आली आहे.