वर्धा जिल्ह्यात पावसामुळे १०० गावांचा संपर्क तुटला !

जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील १०० गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट तालुक्यात १७ जुलैच्या रात्रीपासून सर्वत्र ढगफुटीसदृश पावसामुळे २० गावांत पुराचे पाणी शिरले आहे.

गडचिरोलीत पूर परिस्थितीमुळे २० जुलैपर्यंत शाळा आणि इतर आस्थापने बंद !

मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड, हेमलकसा येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गडचिरोलीत पुरामुळे २ सहस्र ३४५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे

राज्यात कोकणासह मराठवाडा आणि विदर्भ येथे जोरदार पावसाची शक्यता !

मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे, तसेच गडचिरोली, गोंदिया यांसह कोकण आणि मुंबई येथे १८ जुलै या दिवशी सकाळपासून संततधार चालू आहे. कोकणासह विदर्भ आणि मराठवाडा येथील बहुतांश जिल्ह्यांत पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या नियुक्त !

राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्रे सिद्ध करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ११ सहस्र ८३६ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. आपत्कालीन स्थितीत तातडीने साहाय्य करता यावे, यासाठी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला नियुक्त करण्यात आले आहे.

राज्यात पावसाचे ९९ बळी !

मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ सहस्र नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत अजूनही हवामान विभागाने दिलेली ‘रेड अलर्ट’ची चेतावणी तशीच आहे.

कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल !

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची वाटचाल इशारा पातळीकडे (३९ फूट) चालू आहे. १४ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता ही पातळी ३७ फूट २ इंचावर पोचली.

मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी दुर्घटनांचे प्रमाण कायम !

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने घोषित केलेल्या अनुमानावरून राज्यातील काही ठिकाणी ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी दुर्घटना घडत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात ! – शिवसेनेचे महापालिका प्रशासनास निवेदन

गतवर्षी आलेल्या महापुराच्या काळात रंकाळा परिसर, पंचगंगा नदी परिसर येथून बाहेर गेलेले नागरिक आत जाऊ शकत नव्हते आणि आत आलेले बाहेर येऊ शकत नव्हते. नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाहीत, अन्न पुरवठा, तसेच दैनंदिन गरजू वस्तू यांचाही तुटवडा भासला.

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे १६ जणांचे बळी

नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यात पुलावरून पाणी वहात असतांनाही चालकाने गाडी पुलावर घातल्याने मध्यप्रदेशातील एकाच कुटुंबातील ६ जण वाहून गेले. नाशिक जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये एका ६ वर्षांच्या चिमुकलीसह ५ जण, तर नंदुरबार जिल्ह्यात २ महिला वाहून गेल्या आहेत.

वर्धा जिल्ह्यात रात्रभर पावसाचे थैमान

वर्धा तालुक्यातील पवनूर येथे सतत चालू असलेल्या पावसामुळे वन विभागाचा वनराई बंधारा फुटला. त्यामुळे नाल्याला पूर आल्याने पवनूर, खानापूर आणि कामठी या गावांत पाणी शिरले.