Terrorist Attack Pakistan Police : पाकिस्तानात पोलीस ठाण्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणात १० पोलीस ठार !

सार्वत्रिक निवडणुका अवघ्या ३ दिवसांवर आल्या असतांना घडली घटना !

(म्हणे) ‘लोकसभा निवडणुकीनंतर भारताची राज्यघटना पालटणार आणि अल्पसंख्यांकांना डावलले जाणार ! – ‘आर्चडायोसिस ऑफ गोवा अँड दमण’

अशा अफवा पसरवून अल्पसंख्यांकांचे ध्रुवीकरण करणार्‍या नियतकालिकांवर कारवाई व्हायला हवी ! मोगल, ब्रिटीश आणि पोर्तुगीज यांनीही प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार वागायला दिले, तर भारतात मुसलमान आणि ख्रिस्ती कसे निर्माण झाले ? हा ‘रिनोवाकांव’ नियतकालिकाचा खोटारडेपणा आहे !

स्वबळावर  लढणे  भाजपला लाभदायक ! – मंत्री रवींद्र चव्हाण

सर्व बूथ, सुपर वॉरियर्सचे दायित्व पूर्ण होईल. रत्नागिरीत भाजपचा खासदार निवडून आला पाहिजे यासाठी आमची पूर्ण सिद्धता आहे. महाविजयासाठी आम्ही सज्ज आहोत.

Swami Rambhadracharya Maharaj : श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही ज्ञानवापीप्रमाणे निकाल येईल ! – स्वामी रामभद्राचार्य महाराज

हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

Union Budget 2024 : निर्मला सीतारामन् १ फेब्रुवारी या दिवशी सादर करणार अर्थसंकल्प !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा आणि या सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.

Goa LokSabha Elections : लोकसभा निवडणुकीची अधिसूचना फेब्रुवारीअखेर किंवा मार्चपर्यंत येण्याची शक्यता !

तोपर्यंत गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील भाजपचे उमेदवार घोषित केले जातील, अशी माहिती भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

तैवानमध्ये नूतन राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांचा विजय भारताकरता अत्यंत महत्त्वाचा !

तैवानचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (डीपीपीचे) उमेदवार लाई चिंग-ते यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. चीनचा दबाव आणि युद्धाच्या धमक्या झुगारून तैवानच्या नागरिकांनी आपल्या देशाच्या स्वायत्ततेसाठी ठाम भूमिका घेणार्‍या व्यक्तीला राष्ट्राध्यक्षस्थानी बसवले.

अमेरिकेतील पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांची मते महत्त्वपूर्ण ठरणार ! – प्यू रिसर्च सेंटर

गेल्या २० वर्षांत अमेरिकेतील आशिया वंशाच्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे.

Maldives Mayor Election : मालदीवच्या राजधानीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी मुइज्जू यांच्या पक्षाचा पराभव

भारताचे समर्थन करणार्‍या मालदिवियन डेमोक्रॅटिक पक्षाने राजधानीत झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. देशातील विरोधी पक्ष असलेल्या एम्.डी.पी.चे उमेदवार एडम अजीम मालेचे नवे महापौर असतील.

Hollow Warning Pakistan Interim PM : (म्हणे) ‘भारताने निवडणुकीच्या काळात आक्रमण केल्यास प्रत्युत्तर देऊ !’ – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान काकर

पाकिस्तान उसने अवसान आणून अशा प्रकारचे विधान करत आहेत, हे जगाला दिसत आहे. पाक आता स्वतःच्या कर्मानेच नष्ट होणार असल्याने त्याच्यासाठी अन्य कुणी काही करण्याची आवश्यकता नाही, ही वस्तूस्थिती आहे !