Hollow Warning Pakistan Interim PM : (म्हणे) ‘भारताने निवडणुकीच्या काळात आक्रमण केल्यास प्रत्युत्तर देऊ !’ – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान काकर

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान काकर यांची पोकळ चेतावणी !

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवार-उल्-हक काकर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर पाकिस्तानमधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भारताने वर्ष २०१९ मध्ये बालाकोट येथे केलेल्या आक्रमणाप्रमाणे आक्रमण केले, तर पाकिस्तान त्याला त्या वेळी दिले तसेच प्रत्युत्तर आताही देईल, असे विधान पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवार-उल्-हक काकर यांनी केले. ते एका मुलाखतीत बोलत होते.

१. पंतप्रधान काकर पुढे म्हणाले की, आम्ही त्यांच्या (भारताच्या) विमानांवर आक्रमण करू. आमच्या गोळ्या किंवा आमचा संकल्प जुने झालेले नाहीत. आमच्याकडे गोळ्याही आहेत आणि आमचा संकल्पही दृढ आहे. पाकने गेल्या काही वर्षांत सैन्याची क्षमता वाढवली आहे. पाककडून देण्यात येणार्‍या प्रत्युत्तराविषयी कुणीही मनात संशय बाळगू नये.

२. काश्मीरमधील पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनांवर आक्रमण झाले होते. यात ४० सैनिकांना वीरगती मिळाली होती. त्यानंतर भारताच्या वायूदलाच्या विमानांनी २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी पाकच्या बालाकोट येथे जाऊन आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तान उसने अवसान आणून अशा प्रकारचे विधान करत आहेत, हे जगाला दिसत आहे. पाक आता स्वतःच्या कर्मानेच नष्ट होणार असल्याने त्याच्यासाठी अन्य कुणी काही करण्याची आवश्यकता नाही, ही वस्तूस्थिती आहे !