हाथरस (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मिळाली आहे. असाच निर्णय श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही येईल, असे वक्तव्य स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी येथे केले. हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
A verdict similar to the #Gyanvapi case will come regarding the Shri Krishna Janmabhoomi.
– Swami Rambhadracharya Maharaj #GyanvapiMandir #ReclaimTemples pic.twitter.com/yV01HTnTSI— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 1, 2024
ते पुढे म्हणाले की, संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुका येत आहेत. राम-सीतेवर प्रेम न करणार्या विरोधकांना मतदान न करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली पाहिजे. ‘विरोधक श्री रामललाच्या (श्रीरामाचे बालक रूप) मंदिरात गेले नाहीत, तर त्यांना मते घेण्याचा काय अधिकार आहे ?’, असेही ते म्हणाले.