Maldives Mayor Election : मालदीवच्या राजधानीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी मुइज्जू यांच्या पक्षाचा पराभव

भारतविराधी भूमिका घेतल्याने जनतेने धडा शिकवल्याची चर्चा !

एडम अजीम

माले (मालदीव) – भारताचे समर्थन करणार्‍या मालदिवियन डेमोक्रॅटिक पक्षाने (एम्.डी.पी.ने) राजधानी माले शहरात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. देशातील विरोधी पक्ष असलेल्या एम्.डी.पी.चे उमेदवार एडम अजीम मालेचे नवे महापौर असतील. हे पद यापूर्वी चीन समर्थक राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांच्याकडे होते.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी मुजज्जू यांनी महापौरपदाचे त्यागपत्र दिले होते. महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे ‘मुइज्जू यांनी भारतविरोधी भूमिका घेतल्याने त्यांना जनतेने धडा शिकवला’, असे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताच्या लक्षद्वीप येथील पर्यटनावरून मालदीव आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.

सौजन्य दैनिक जागरण 

एम.डी.पी.चे नेतृत्त्व माजी राष्ट्रपती महंमद सोलिह करतात. ‘भारत समर्थक नेते’ अशी त्यांची ओळख आहे. महापौरपदाची निवडणूक जिंकल्याने त्यांच्या पक्षाला उभारी  मिळाली आहे.