‘आर्चडायोसिस ऑफ गोवा अँड दमण’ यांच्या नियतकालिकाचा संपादकियामध्ये दावा !
पणजी, ३ फेब्रुवारी (वार्ता.) : लोकसभा निवडणुकीनंतर भारताची राज्यघटना पालटली जाणार आणि अल्पसंख्यांकांना स्वत:च्या देशातच ‘विदेशी’ बनवले जाणार आहे (डावलले जाणार), अशी अफवा सर्वत्र पसरली आहे आणि यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगून राज्यघटना सुरक्षित ठेवण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन चर्च संस्थेच्या ‘आर्चडायोसिस ऑफ गोवा अँड दमण’ यांच्या ‘रिनोवाकांव’ या नियतकालिकाच्या संपादकियामध्ये करण्यात आले आहे.
यात पुढे म्हटले आहे की, भारताच्या पुरातन इतिहासामध्येही कधीही भारत ईश्वरशासित प्रदेश (थियोक्रेटीक किंगडम) करण्याचा प्रयत्न झालेला नाही. सध्या सामाजिक माध्यमांत आणि रस्त्यारस्त्यावर ‘भारताची राज्यघटना पालटली जाणार. भारत एक ईश्वरशासित प्रदेश होणार. अल्पसंख्यांकांना डावलले जाणार’, अशी चर्चा आहे. भारताच्या दूरदृष्टी असलेल्या आणि धाडसी स्वातंत्र्यसैनिकांनी देश सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष रहाण्यासाठी, तसेच येथील लोकशाही टिकवण्यासाठी लढा दिला. मोगल, ब्रिटीश आणि पोर्तुगीज यांनीही प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार वागायला आणि धर्माचा प्रचार करायला मोकळीक दिली होती.(मोगल, ब्रिटीश आणि पोर्तुगीज यांनीही प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार वागायला दिले, तर भारतात मुसलमान आणि ख्रिस्ती कसे निर्माण झाले ? हा ‘रिनोवाकांव’ नियतकालिकाचा खोटारडेपणा आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअशा अफवा पसरवून अल्पसंख्यांकांचे ध्रुवीकरण करणार्या नियतकालिकांवर कारवाई व्हायला हवी ! |