Terrorist Attack Pakistan Police : पाकिस्तानात पोलीस ठाण्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणात १० पोलीस ठार !

सार्वत्रिक निवडणुका अवघ्या ३ दिवसांवर आल्या असतांना घडली घटना !

घटनास्थळ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील सार्वत्रिक निवडणुका अवघ्या ३ दिवसांवर आल्या असून राजकीय पक्षांच्या प्रचाराने तेथे गती पकडली आहे. अशातच देशात आतंकवादी आक्रमणेही वाढली आहेत. ५ फेब्रुवारीच्या पहाटे काही जिहादी आतंकवाद्यांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान शहरात असलेल्या एका पोलीस ठाण्याला लक्ष्य केले. यामध्ये १० पोलीस ठार झाले, तर ६ जण घायाळ झाले. घायाळांची प्रकृतीही चिंताजनक आहे. या वेळी आतंकवाद्यांनी पोलीस ठाण्यात घुसून अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली.

४ फेब्रुवारी या दिवशी बलुचिस्तान प्रांतातील नुष्की जिल्ह्यात पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेरही एक बाँबस्फोट झाला होता. या आक्रमणात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

संपादकीय भूमिका

  • आता यावरून पाकिस्तानी यंत्रणेने या आक्रमणामागे भारताचा हात असल्याची बांग ठोकायला आरंभ केला, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • जे पेरले, तेच उगवले आणि ज्याने पेरले, त्याचाच घात होत आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिहादचा निर्माता पाकिस्तान !