वर्ष २०२२ मधील रथोत्सवासाठी भाड्याने रथ आणल्यावर ‘तो परत करू नये’, असे वाटणे आणि महर्षींनी वर्ष २०२३ मधील रथोत्सवासाठी रथ बनवण्याची आज्ञा देणे

रथोत्सव झाल्यानंतर आम्ही प.पू. गुरुदेवांना विचारले, ‘‘हा रथ परत पाठवण्यासाठी मन सिद्ध होत नाही. आपण हा रथ ठेवून घेऊया का ?’’ तेव्हा प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ‘‘हा रथ परत पाठवायचा आहे ना, तर पाठवूया. पुढे देवाची इच्छा असेल, तर आपला रथ सिद्ध होईल.’’

संतांची सुवचने

सनातनच्या प्रत्येक साधकामध्ये अध्यात्मात प्रगती करण्याची क्षमता असल्यामुळे सर्वांनी झोकून देऊन प्रयत्न करावेत !

पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांच्या संतसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !

‘पू. सत्यनारायण तिवारीकाका हे सनातनच्या १२४ व्या संतपदी विराजमान झाले’. या संतसोहळ्याचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण लेखबद्ध करूत हा लेख कृतज्ञताभावाने पुष्पांच्या स्वरूपात पू. सत्यनारायण तिवारी यांच्या सुकोमल चरणी अर्पण करत आहे.

पू. सत्यनारायण तिवारी यांच्या संत सन्मानसोहळ्याच्या वेळी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि बाबा यांच्यात चैतन्याच्या स्तरावर संवाद होत होता. तेथे शारीरिक आणि मानसिक या स्तरांवर काहीच नव्हते. ‘सोहळा आणि त्यातील संवाद आध्यात्मिक स्तरावर असल्याने बाबा बसू शकले’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.

सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील आश्रमात पार पडला चंडी याग !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ब्रह्मोत्सव सोहळ्यानंतर १४ आणि १५ मे या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी चंडी याग करण्यात आला. या यागात सप्तशतीचे पाठ करत आहुती देण्यात आली.

तिन्ही मोक्षगुरूंनी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांचे महत्त्व  

सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांच्या ठिकाणी साक्षात् श्रीमन्नारायणाचे तेजस्वरूप असणारा सूर्यनारायणच त्याच्या सात पांढर्‍या अश्वांच्या रथावर आरूढ होऊन भूलोकी अवतरणार होता. त्यामुळे सूर्यनारायणाचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपित करणारे केशरी किंवा भगव्या रंगाचे वस्त्र सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांनी परिधान केले होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवरूपी’ ८१ व्या जन्मोत्सवाचे  कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

वैशाख कृष्ण पक्ष षष्ठीच्या शुभतिथीला फर्मागुडी, गोवा येथील मैदानावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ‘ब्रह्मोत्सवा’च्या रूपात अत्यंत हर्षाेल्हासात साजरा झाला. हा सोहळा इतका भव्य आणि दिव्य होता की, या सोहळ्याला उपस्थित असणार्‍या साधकांना हा ब्रह्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ पाहिल्याचे पूर्ण समाधान लाभले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी संत आणि मान्यवर यांनी अर्पिलेली कृतज्ञतासुमने !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला अनेक संत, मान्यवर आणि हितचिंतक उपस्थित होते. त्यापैकी काहींनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत देत आहोत. 

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री भवानीदेवीच्‍या मंदिरात देवीच्‍या पादुकांची प्रतिष्‍ठापना !

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेनुसार येथील सनातनच्‍या आश्रमात १२ मे २०२३ या दिवशी श्री भवानीदेवीच्‍या मंदिरात देवीच्‍या पादुकांची प्रतिष्‍ठापना भावपूर्ण वातावरणात करण्‍यात आली.

१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ यागाचे थेट प्रक्षेपण पहातांना देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती

‘यज्ञाच्या आधी पू. भार्गवराम (सनातनचे पहिले बालसंत, वय ६ वर्षे) यांची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. त्या वेळी पू. भार्गवराम हे श्रीकृष्ण रूपात दिसल्यानंतर सेवाकेंद्राच्या जवळ मोर ओरडल्याचा आवाज ऐकू येत होता.