१. यज्ञ चालू होण्यापूर्वी
अ. ‘यज्ञाच्या आधी पू. भार्गवराम (सनातनचे पहिले बालसंत, वय ६ वर्षे) यांची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. त्या वेळी पू. भार्गवराम हे श्रीकृष्ण रूपात दिसल्यानंतर सेवाकेंद्राच्या जवळ मोर ओरडल्याचा आवाज ऐकू येत होता.
आ. ‘यज्ञाच्या आदल्या दिवशी देवद येथे पुष्कळ पाऊस पडल्यामुळे यज्ञाचे थेट प्रक्षेपण होऊ शकले नाही’, असे सांगण्यात आले. तेव्हा ‘त्या दिवशी देहलीमध्येही पावसाळी वातावरण होते आणि सकाळी थोडासा पाऊसही पडला होता’, हे माझ्या लक्षात आले.
इ. यज्ञाला आरंभ होण्यापूर्वी काही वेळ सूर्यास्तानंतर देहली सेवाकेंद्राच्या परिसरात अंधार पडलेला असूनही उजेड असल्याचे जाणवत होते. त्या वेळी जसे ‘कुठेतरी एखादा दिवाच लावलेला आहे’, असे वाटत होते. ‘सीसीटीव्ही कॅमेर्या’त (टीप) पाहिल्यावरही सेवाकेंद्राच्या परिसरात उजेड दिसत होता. अन्य दिवशी या वेळी अशा प्रकारचा उजेड दिसत नाही. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांनी हा पालट आमच्या लक्षात आणून दिला.
२. यागाच्या वेळी
अ. यागाच्या वेळी देहली येथे गरुडपक्षी उडतांना दिसणे आणि त्याच वेळी पनवेल येथे यज्ञाचे निवेदक श्री. विनायक शानभाग यांनी ‘गरुडदेव आले होते’, असे सांगणे : १७.३.२०२३ या दिवशी पनवेल येथे होणार्या ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ यागाच्या वेळी साधकांना उपस्थित रहाण्याची सूचना मिळाली. तेव्हा सेवाकेंद्रावरून गरुडपक्षी उडतांना दिसले. यज्ञ चालू असतांना निवेदक श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) सूत्र सांगत होते. त्यामध्येही त्यांनी ‘यज्ञाच्या वेळी ‘गरुडदेव आले होते’, असे सांगितले.
आ. यज्ञ चालू असतांना अधूनमधून माझे मन एकाग्र होत होते. आम्ही सर्व जण डोळे मिटून बसलो होतो. तेव्हा मला ‘मंत्र ऐकतच रहावेत’, असे वाटत होते.
इ. यज्ञाच्या वेळी श्री. विनायक शानभाग श्रीसत्शक्ति ( सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी सांगत होते. तेव्हा सेवाकेंद्राच्या जवळ पुष्कळ मोर ओरडल्याचा आवाज ऐकू येत होता.’
– कु. मनीषा माहूर, देहली सेवाकेंद्र, देहली. (१९.३.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |