अंगावर किती वेळ ऊन घ्यावे ? 

त्वचेचा जेवढा अधिक भाग उन्हाच्या थेट संपर्कात येतो, तेवढे शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात निर्माण होते.

हाडांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी प्रतिदिन अंगावर ऊन घ्या !

आजकाल हाडांची घनता मोजण्याची चाचणी (बोन मिनरल डेंसिटी टेस्ट) केल्यास बहुसंख्य लोकांमध्ये हाडांची घनता न्यून असल्याचे लक्षात येते. याचे एक मुख्य कारण म्हणजे पालटत्या जीवनशैलीमुळे अंगावर ऊन न पडणे.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

गोवरसारख्या साथीच्या विकारांचा प्रतिबंध होण्यास साहाय्यक आयुर्वेदाचे उपचार

सकाळी आणि सायंकाळी ‘सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण’, ‘सनातन वासा (अडुळसा) चूर्ण’ आणि मध प्रत्येकी चहाचा पाव चमचा प्रमाणात एकत्र मिसळून लहान मुलांना द्यावे. ३ वर्षांपेक्षा लहान मुलांना हे औषध अर्ध्या प्रमाणात द्यावे.

स्वास्थ्यकर आहाराचे २१ मंत्र अवलंबा आणि निरोगी रहा !

आयुर्वेदाचे नियम आयुर्वेदाच्याच परिभाषेत जाणून घ्यायला हवेत. ते शाश्वत आणि एतद्देशीय (मूळचे) असल्याने अत्यंत उपयुक्त आहेत, हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे.

गोवर आला असल्यास पाळायचे पथ्य

गोवराचा पुरळ अंगावर दिसू लागल्यास मुलाला शाळेत न पाठवता घरीच ठेवावे. शक्यतो त्याला इतरांच्या संपर्कात येऊ देऊ नये. दूध आणि दुधाचे पदार्थ टाळावेत. अल्पाहारासाठी शिरा, उपमा, घावन किंवा भाकरी, तर जेवणामध्ये वरणभात आणि तिखट अन् तेलकट नसलेली भाजी असावी.

उन्हापासूनचे अपाय टाळण्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे !

सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत अंगावर ऊन घेतल्यास अधिक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व बनते’. परंतु या काळात तीव्र उन्हामुळे पित्त वाढून अपाय होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे उन्हापासूनचे अपाय टाळण्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे.’

शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण होण्यासाठी उन्हाचा त्वचेशी थेट संपर्क आवश्यक !

‘काचेतून येणार्‍या सूर्यकिरणांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाच्या निर्मितीसाठी आवश्यक असे अतीनील किरण गाळले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाचा त्वचेशी थेट संपर्क येईल, असे पहावे.’

कोणत्या प्रकारच्या पोटदुखीमध्ये पाणी पिऊ नये ?

‘तीव्र पोटदुखी आणि एकापेक्षा अधिक उलट्या झाल्या असतील, तर पोटाचा गंभीर विकार असू शकतो, अशा रुग्णांनी तोंडाने पाणीसुद्धा घेणे धोक्याचे असते. त्यामुळे असा प्रसंग ओढवल्यास घरगुती उपचार न करता तातडीने आधुनिक वैद्यांना दाखवावे.’

भगवंताची कृपा आणि वाचकांनी भरभरून दिलेले प्रेम यांमुळेच ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ लेखमालिकेचे १०० भाग पूर्ण !

भगवान धन्वन्तरि आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा, तसेच वाचकांनी भरभरून दिलेले प्रेम यांमुळे ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेचा शंभरावा भाग आज प्रकाशित होत आहे. त्या निमित्ताने . . .