गोवरसारख्या साथीच्या विकारांचा प्रतिबंध होण्यास साहाय्यक आयुर्वेदाचे उपचार

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १०५

वैद्य मेघराज पराडकर

‘सकाळी आणि सायंकाळी ‘सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण’, ‘सनातन वासा (अडुळसा) चूर्ण’ आणि मध प्रत्येकी चहाचा पाव चमचा प्रमाणात एकत्र मिसळून लहान मुलांना द्यावे. ३ वर्षांपेक्षा लहान मुलांना हे औषध अर्ध्या प्रमाणात द्यावे. हा उपचार साथीच्या तीव्रतेनुसार ७ ते १५ दिवस करावा. प्रत्यक्ष गोवर आला असतांनाही हा उपचार करता येतो. गोवर आला असल्यास स्थानिक वैद्यांना दाखवून उपचार घ्यावेत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२२)