उन्हापासूनचे अपाय टाळण्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १०३

संग्रहित चित्र
वैद्य मेघराज पराडकर

‘उन्हातील ‘ब’ प्रकारचे (अल्ट्राव्हायोलेट बी) अतीनील किरण त्वचेच्या थेट संपर्कात आल्यावर शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व बनते. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पडणार्‍या उन्हामध्ये हे अतीनील किरण अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे ‘या वेळेत अंगावर ऊन घेतल्यास अधिक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व बनते’, असे आधुनिक संशोधन आहे; परंतु या काळात अंगावर ऊन घेणे सर्वांना सहन होत नाही. तीव्र उन्हामुळे पित्त वाढून अपाय होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे उन्हापासूनचे अपाय टाळण्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२२)