सात्त्विकतेची ओढ असलेली मुंबई येथील चि. पद्ममालिनी सालियन (वय १ वर्ष) !

‘पद्ममालिनीला जयघोष करायला सांगितल्यावर ती हात उंचावून प्रतिसाद देते. ती भक्तीसत्संग शांतपणे ऐकते. ती रामाचा पाळणा, मारुतिस्तोत्र आणि दत्ताचा नामजप ऐकून झोपते.

साधकाला सूक्ष्मातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असे जाणवणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाही ‘प्रतिदिन साधक समवेत आहे’, असे जाणवणे

एकदा मी प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्याकडे एका सेवेनिमित्त गेलो होतो. त्या वेळी आमच्यात पुढील संवाद झाला……..

प्रसार करण्यासाठी एका घरी गेल्यानंतर तेथील निरंकारी संप्रदायातील व्यक्तीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव ऐकल्यावर ‘परमात्म्याने घरी लक्ष्मी पाठवल्या आहेत’, असे म्हणून साधिकांना नमस्कार करणे

आमच्याकडे सात्त्विक उत्पादने वितरित करण्याची सेवा आहे. त्यासाठी आम्ही एका घरात गेलो होतो. तेव्हा तेथे एक आजोबा भेटले. ते निरंकारी संप्रदायाचे होते. त्यांनी आम्हाला अनेक प्रश्न विचारले. आम्ही न घाबरता त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) यांना पहायला गेल्यावर रामनाथी आश्रमातील सौ. अंजली जयवंत रसाळ यांना आलेल्या अनुभूती !

पू. आजींकडे पाहिल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचीच आठवण येत होती. ‘त्या गुरुचरणांशी एकरूप झाल्या आहेत’, असे मला जाणवत होते.

वर्ष २०२४ मध्ये रामनाथी (गोवा) येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ किंवा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ यांत हिंदुत्वनिष्ठांना त्यांची प्रकृती आणि आवड यांनुसार साधना करण्यास सांगितले जाते. त्यामुळे त्यांना मनःशक्तीकडून चित्तशक्तीच्या स्तरावर जाण्यास साहाय्य होते.

भाकरी करण्यासाठी मोठ्या तव्याजवळ ४ घंटे उभी असूनही साधिकेला उष्णतेचा त्रास न जाणवता तिने स्थिरता अनुभवणे

‘२.५.२०२४ या दिवशी वातावरणात पुष्कळ उष्मा जाणवत होता. त्या दिवशी स्वयंपाकघरात सर्व साधकांसाठी भाकरी करण्याची सेवा होती. मी भाकरी करण्यासाठी मोठ्या तव्याजवळ ४ घंटे उभी होते; मात्र मला उष्णतेचा त्रास जाणवला नाही. मी ही सेवा करतांना सतत जयघोष करत होते.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्तवात्सल्याश्रमातील श्री गणेश यागानंतर यज्ञकुंडात श्री गणेशाचे रूप प्रकटले !

सनातनचे श्रद्धास्थान, तसेच शिष्य डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या येथील भक्तवात्सल्याश्रमात प्रतिवर्षीप्रमाणे श्री गणेशचतुर्थी साजरी करण्यात आली. यानिमित्त १६ सप्टेंबर या दिवशी श्री गणेश याग करण्यात आला.

प्रसंगांत मानसिक स्तरावर राहिल्याने साधिकेची झालेली हानी आणि प्रसंगांत आध्यात्मिक स्तरावर रहात असल्याने साधिकेला होत असलेले लाभ !

प्रसंगांत आध्यात्मिक स्तरावर राहिल्याने अधिक योग्य विचार होऊन अस्वस्थता लगेच नष्ट होणे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती

झोपेत वरच्या दिशेने वेगाने जात असल्याचे पाहून साधिकेला दचकून जाग येणे आणि याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर त्यांनी येणार्‍या अनुभूतींचा अभ्यास करण्यास सांगणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या कालावधीत मुंबई अन् पालघर येथील साधकांनी अनुभवलेली भावस्थिती !

‘रथारूढ विष्णुस्वरूप गुरुमाऊलींचे दर्शन झाल्यावर मी सूक्ष्मातून त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. मी प्रार्थना केली, ‘हे देवा, मला आता तुझ्याविना काहीच नको. केवळ तूच हवा आहेस.’ त्या क्षणी मला गुरुदेवांचे विराट रूपात दर्शन झाले.