१. वय १ ते ५ मास
१ अ. ‘चि. पद्ममालिनी सतत परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात आहे’, असे वाटणे : ‘मी चि. पद्ममालिनी हिच्या कानात सतत प्रार्थना आणि नामजप सांगायचे. त्या वेळी ती स्थिर दृष्टीने माझ्याकडे बघायची. ‘ती सतत परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात असते’, असे मला वाटायचे.’ – सौ. संजीवनी ठमके (चि. पद्ममालिनी हिची आजी (आईची आई)) चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
१ आ. ‘बर्फ म्हणजे परात्पर गुरुदेवांच्या चैतन्याचा गोळा आहे’, असा भाव ठेवून बर्फाचा शेक दिल्यावर न रडता शांतपणे शेक घेणे : ‘पद्ममालिनी २ मासांची असतांना आधुनिक वैद्यांकडून तिला औषधाचा ‘डोस’ देऊन आणल्यावर तिच्या पायाला बर्फाने शेकवतांना प्रारंभी ती रडली. तेव्हा मी तिला भावजागृतीचा प्रयोग सांगितला, ‘बर्फ म्हणजे परात्पर गुरुदेवांच्या चैतन्याचा गोळा आहे. त्यातून चैतन्य आणि वेदना सहन करण्याची शक्ती मिळत आहे.’ त्यानंतर तिचे रडणे थांबले आणि तिने शांतपणे शेक घेतला.
१ इ. देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे
१. ती ४ मासांची असतांना आम्ही देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. आम्ही आश्रम पहात असतांना पद्ममालिनीला ध्यानमंदिरात नेले. त्या वेळी तिथे साधक नामजपाला बसले होते. मी पद्ममालिनीला सांगितले, ‘‘आवाज करायचा नाही. साधक नामजप करत आहेत.’’ त्यानंतर जोपर्यंत ती ध्यानमंदिरात होती, तोपर्यंत ती शांत राहिली; मात्र ध्यानमंदिरातून बाहेर आल्यावर ती हुंकार देऊ लागली.
२. ध्यानमंदिरात ‘गुरुपादुकांवर डोके टेकवून नमस्कार कर’, असे मी तिला सांगितले आणि तिला पादुकांपुढे उपडी ठेवले. त्या वेळी तिने पादुकांच्या समोर डोके टेकवून नमस्कार केला.
३. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याकडे गेल्यावर पद्ममालिनीने स्वतःहून हात जोडले. ‘आश्रमात रहाणार का ?’, असे त्यांनी विचारल्यावर तिने हुंकार दिला.
१ ई. पद्यमालिनीला ‘धर्मप्रचार करणार का ?’, असे विचारल्यावर तिने हुंकार देणे : पद्यमालिनी ५ मासांची असतांना ‘जीविका परीक्षा’ (टीप) या विधीच्या वेळी तिच्या भोवती ठेवलेल्या वस्तूंपैकी तिने धर्मशिक्षणाचे पत्रक आणि पैसे हातात घेतले. त्या वेळी ‘तू प्रसारात जाऊन अर्पण गोळा करणार का ?’, असे मी तिला विचारले. त्यावर तिने हुंकार दिला.
टीप – जीविका परीक्षा : या विधीच्या वेळी बाळाच्या भोवती काही वस्तू ठेवतात. त्या वस्तूंपैकी बाळ ज्या वस्तूकडे वळेल किंवा ज्या वस्तूला हात लावेल, त्या वस्तूवरून ‘बाळाच्या आयुष्याचा कल कुठे असेल ?’, हे कळते.’
– सौ. दर्शना देवीप्रसाद सालियन (चि. पद्ममालिनी हिची आई), मुंबई
२. वय १० ते १२ मास
२ अ. ‘ती अनोळखी व्यक्तींनाही हसून प्रतिसाद देते.
२ आ. ती नेहमी अंगठा आणि तर्जनी यांची टोके जुळवून ज्ञानमुद्रा करून झोपते. त्या वेळी ‘ती जप किंवा ध्यान करत आहे’, असे आम्हाला जाणवते.
२ इ. स्वतःच्या हातातील वस्तू इतरांना देतांना ती आनंदी असते.’
– कुटुंबातील सर्व सदस्य
२ ई. सात्त्विक गोष्टींची आवड : ‘पद्ममालिनीला जयघोष करायला सांगितल्यावर ती हात उंचावून प्रतिसाद देते. ती भक्तीसत्संग शांतपणे ऐकते. ती रामाचा पाळणा, मारुतिस्तोत्र आणि दत्ताचा नामजप ऐकून झोपते. तिला जेवण भरवतांना भजन आणि दत्ताचा नामजप लावल्यावर ती जेवते. तिला मारुतीचे चित्र पुष्कळ आवडते.
प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर तिला आनंद होतो.’
– सौ. संजीवनी ठमके (चि. पद्ममालिनी हिची आजी (आईची आई)) आणि कु. भार्गवी ठमके (चि. पद्ममालिनी हिची मामेबहीण), चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
२ उ. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !’, असा जयघोष केल्यावर शांत झोपणे : ‘दुपारी किंवा रात्री ती झोपेतून रडत उठायची. त्या वेळी मी तिला सांगायचे, ‘‘तू कशाला घाबरतेस ? डॉक्टरबाबा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या हृदयात आहेत. ते तुझे रक्षण करत आहेत.’’ त्यानंतर ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !’, असा जयघोष केल्यावर ती शांत झोपते.’
‘हे गुरुदेवा, ‘तुम्हीच बाळाची आणि माझी तुम्हाला अपेक्षित अशी साधना करून घ्या’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. दर्शना देवीप्रसाद सालियन (३०.७.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |