१. ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा हीच स्थिती पू. दातेआजी अनुभवत आहेत’, असे वाटणे
‘१२.६.२०२४ या दिवशी मी काही साधिकांसह सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी संत) पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते. त्या शांतपणे पलंगावर झोपल्या होत्या. त्यांच्या चेहर्याकडे पाहिल्यावर ‘त्या गुरुस्मरणात तल्लीन आहेत’, असे मला वाटले. त्या वेळी मला प.पू. भक्तराज महाराजांच्या भजनातील ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा’ ही ओळ आठवली. ‘त्या हीच स्थिती अनुभवत आहेत’, असे वाटत होते. ‘संत मीराबाईंची जी भावस्थिती होती, त्याच भावस्थितीत पू. आजी डुंबून गेल्या आहेत’, असे मला जाणवत होते. खोलीतील वातावरण मला एकदम हलके वाटत होते.
२. पू. आजींकडे पाहिल्यावर त्या गुरुचरणांशी एकरूप झाल्याचे जाणवणे
पू. आजींकडे पाहिल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचीच आठवण येत होती. ‘त्या गुरुचरणांशी एकरूप झाल्या आहेत’, असे मला जाणवत होते.
३. कृतज्ञता
संत सहवास देऊन ‘भावस्थिती कशी असते’, हे मला पहायला आणि अनुभवायला दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. अंजली जयवंत रसाळ (वय ५४ वर्षे), जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर . (१२.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |