‘आमच्याकडे सात्त्विक उत्पादने वितरित करण्याची सेवा आहे. त्यासाठी आम्ही एका घरात गेलो होतो. तेव्हा तेथे एक आजोबा भेटले. ते निरंकारी संप्रदायाचे होते. त्यांनी आम्हाला अनेक प्रश्न विचारले. आम्ही न घाबरता त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तेव्हा त्यांनी आम्हाला ‘तुमचे गुरु कोण ?’, असे विचारले. आम्ही त्यांना ‘आमचे गुरु सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझ्या घरी परमात्म्याने लक्ष्मी पाठवल्या आहेत’’ आणि ते आम्हाला नमस्कार करू लागले.’
– सौ. राधिका गणेश पुजारे, गिर्ये (विजयदुर्ग), जिल्हा सिंधुदुर्ग.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |