परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तसेच त्यांचे कार्य यांच्याविषयी सप्तर्षींनी काढलेले गौरवोद्गार !

पृथ्वीवरील पाण्याचे रूपांतर वाफेत होऊन पाऊस पडतो. त्याप्रमाणे पृथ्वीवर असलेल्या सनातनच्या तिन्ही गुरूंच्या शक्तीचे ब्रह्मांडातील वैश्विक शक्तीत रूपांतर होते आणि ती शक्ती कार्य करते.

सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपाछत्राखाली साधना करणारा जीवच भीषण आपत्काळात तरून जाईल !

गुरुपौर्णिमेला १ सहस्र पटींनी गुरुतत्त्व कार्यरत असते. अन्य काळात सहस्रो वर्षे साधना केल्यानंतर जे फळ मिळते, तेच फळ संधीकाळामध्ये काही काळ साधना केल्याने मिळते. त्यातही श्रीमन्नारायणाच्या मार्गदर्शनाखाली राहून साधना करायला मिळते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जीवनात झालेले पालट

राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य झोकून देऊन मुक्तपणे करता येण्यासाठी देवाने मुलगी दिल्याने मुला-बाळांमध्ये न अडकता साधनेसाठी सर्वस्व देता येणे

‘न भूतो न भविष्यति’ अशा झालेल्या वर्ष २०२० मधील गुरुपौर्णिमेच्या वेळी पुणे येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेचा प्रत्येक साधकाने घरात राहून आनंद अनुभवला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधकांनी अनुभवलेला गुरुकृपेचा वर्षाव अनुभूतींच्या रूपात येथे देत आहोत. 

‘आपत्काळ’ हीसुद्धा भगवंताची एक लीला असून परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति ( (सौ.) अंजली गाडगीळ यांना शरण जाऊन आपत्काळाला सामोरे जाऊया !

आपत्काळ हा आपल्या सर्वांसाठी एक युद्धच आहे. त्याला सामोरे जाणे, ही साधनाच आहे. श्रीविष्णूची ही परीक्षा आपले प्रारब्ध आणि संचित यांची परीक्षा असून ही आपल्या गुरुनिष्ठेची अन् श्रद्धेचीही परीक्षा आहे. ही परीक्षा जेवढी कठीण आहे, तेवढाच या परीक्षेचा शेवट पुष्कळ गोड आहे.

संत आणि मान्यवर यांनी जाणलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

पूर्वीपासूनच समाजातील संत आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची अवतारी वैशिष्ट्ये जाणली होती. सूर्य उगवल्याचे सर्वांना सांगावे लागत नाही, ते आपोआपच कळते, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाची अनुभूती सर्वांना येते !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून ईश्वराने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील एकरूपतेची दिलेली प्रचीती !

सद्गुरुद्वयींच्या एकरूपतेची प्रचीती ईश्वरानेच एका अनोख्या अनुभूतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिली. ईश्वराची ही सुंदर लीला सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना एका साधकाने लक्षात आणून दिली.

‘पुढे घराघरांत लोक तुला पूजतील’, या प.पू. भक्तराज महाराजांनी (प.पू. बाबांनी) परात्पर गुरु डॉक्टरांना दिलेल्या आशीर्वादाप्रमाणेच महर्षींनीही सांगणे आणि त्याची मिळत असलेली प्रचीती

हिरा कितीही लपवला तरी त्याचा प्रकाश लपत नाही किंवा अल्प होत नाही. चैतन्याच्या ओढीने प्रवास करणार्‍याला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून पहिल्याच दृष्टीक्षेपात ‘यात काहीतरी वेगळे आहे’, असे जाणवते आणि तो एका अनामिक अशा आकर्षण शक्तीने त्याकडे ओढला जातो.

परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना महर्षींनी दिलेले वचन

गुरूंसाठी पृथ्वीवर आलेल्या साधकांकडे महर्षींचे दिवस-रात्र लक्ष आहे. हे तीनही गुरु जातांना त्यांची सर्व कीर्ती आपल्या साधकांना देऊन जाणार आहेत.

देवळातील चैतन्य टिकवण्याचे देवस्थान समितीचे दायित्व !

चला, तर देऊळ सात्त्विक करण्यासाठी झटूया आणि त्यासाठी देवळात ठिकठिकाणी समष्टी साधना म्हणून धर्मशिक्षणाचे अभियान राबवून तेथील भ्रष्टाचाराला आळा घालून देवतेची कृपा संपादन करूया