महामार्गांवरील फलकांवर ‘अहिल्यानगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ नावे त्वरित लावावीत !
अशी मागणी का करावी लागते ? शासकीय निर्णयाची प्रभावी कार्यवाही तत्परतेने कधी होणार ?
अशी मागणी का करावी लागते ? शासकीय निर्णयाची प्रभावी कार्यवाही तत्परतेने कधी होणार ?
अहिल्यानगर येथे जुलै २०२५ मध्ये अमरनाथ, वैष्णोदेवी आणि अन्य धार्मिक स्थळांच्या सहलीचे नियोजन सांगून त्यात ‘हेलिकॉप्टर’ने दर्शनासाठी जाऊ शकतो’, असे खोटे सांगितले.
इस्कॉनने अधिक महिन्याचे औचित्य साधून भागवत कथेचे केलेले आयोजन भाविकांची भक्तीभाव वृद्धींगत करणारे ठरले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी केले. येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये इस्कॉनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याच्या सांगतेप्रसंगी ते बोलत होते.
काही गावांत बंद झालेल्या मूळच्या यात्रा पुन्हा चालू कराव्यात, तसेच दर्ग्यामध्ये रूपांतरित झालेली हिंदूंची देवस्थाने पुन्हा मिळवण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. संग्राम जगताप यांनी केले.
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना भगवान श्रीकृष्णाला विसरू नका. श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा, असे जाहीर आवाहन ज्येष्ठ ब्रम्हचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले. येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
श्रीमान रेवतीनंदन दास म्हणाले की, जीवन मनमानी पद्धतीने घालवतात त्यांना सद्गती मिळत नाही. जीवन सार्थकी होण्यासाठी आपल्या पिढीजात परंपरा श्रध्देने जतन कराव्या. संतांचा सत्संग आणि गुरूंचे सानिध्य मिळवावे. गुरू आपल्या सानिध्यातील कुणालाही कधीही भरकटू देत नाहीत. गुरू वैयक्तिक मार्गदर्शन करत उद्धाराचा मार्ग दाखवतात.
भागवत कथा भवरोगावरची प्रभावी औषधी आहे. पशूहत्या-आत्महत्या करणार्यांना भागवत कथेत रूची रहाणार नाही. भगवंताने बुद्धी देऊन सर्वांना स्वतंत्रता दिली आहे. कोणत्या मार्गाने चालायचे ? हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. गीता-भागवताचे श्रवण केल्याने कल्याणच होते, असा मार्गदर्शन ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान् रेवतीनंदन दास यांनी केले.
शहरातील व्यायामशाळेतील तरुणांना प्रथिने आणि स्नायूवर्धक औषधांच्या नावाखाली गुंगीकारक औषधांची विक्री होत होती. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी शेरू राजू शेख याला अटक केली असून त्याचा साथीदार मोहसिन शेख पसार झाला आहे.